संग्रहित फोटो
पुणे : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यवस्तीसह इतर भागात तात्पुरता वाहतूकीत बदल केले असून, गुरुवारी (दि १९) रात्री दहा ते सोमवारी (दि २३) रात्री अकरा वाजेपर्यंत हा बदल असणार आहे. दरम्यानच्या कालावधीत शहरात प्रवेश होणार्या २६ रस्ते, चौकातून अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
पुण्यात दोन्ही पालख्यांचे शुक्रवारी (दि २०) आगमन होत असून, त्या शनिवारी व रविवारी मुक्कामी असणार आहेत. यामुळे हे वाहतूक बदल केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पालखीचा मार्ग असलेल्या रस्त्यांना जोडणाऱ्या १२४ ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. तर मुक्काम परिसरातील ३८ ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. तसेच या दोन्ही पालखी प्रास्थान मार्गावरील २३० ठिकाणी वाहतूक बंद केली. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जड वाहनांना या चौकांपासून प्रवेश बंद
सर्व वाहनांना प्रवेश बंद