संग्रहित फोटोे
छत्रपती संभाजीनगर : भरधाव आलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे युवक गंभीर जखमी झाले. यामध्ये एकाचे पाय व दोन्ही हाताचे हाडे मोडली असून, दुसऱ्यास किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात जय भवानी चौकात घडला.
अनिल तातेराव डुगले (वय ३०, रा. मयुर पार्क) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आणि त्यांचा मित्र मयुर प्रकाश जैस्वाल (रा. घृष्णेश्वर कॉलनी) हे २० ऑक्टोबर रोजी रात्री कपडे घेण्यासाठी जय भवानीनगर येथे गेले होते. कपडे घेऊन दोघे दुचाकीवर (एमएच-२०-जीयू ९२५४) परत मयूर पार्ककडे निघाले असता जय भवानी चौकाजवळ स्वस्त धान्य दुकानासमोरून भरवेगात आलेल्या एका रिक्षाचालकाने त्यांना कट मारत धडक दिली.
या धडकेनंतर दोघे रस्त्यावर कोसळले. डुगले यांना उठता येईना म्हणून त्यांचे नातेवाईक प्रल्हाद बाबुलाल जैस्वाल (रा. जय भवानीनगर) यांना बोलावून घेतले, त्यांनी दोघांनाही तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरानी तपासणी करून फिर्यादी डुगले यांचा डावा पाय गुडघ्याखालीपासून पोटद्वापर्यंत तसेच दोन्ही मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. तर मित्र मयुर जैस्वाल यालाही पाठी व मानेवर दुखापत झाली.
या घटनेनंतर रिक्षाचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, सदर रिक्षा नंबर हिरवा प्लेट असल्याने ती इलेक्ट्रिक रिक्षा असल्याचा संशय आहे. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातही भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, कोंढापुरी (ता. शिरुर) नजीक पुणे- नगर महार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात होऊन तब्बल १६ प्रवासी गंभीर जखमी होऊन तीन वाहनाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एम एच १४ सि डब्ल्यू ४१५५ या लग्झरी बस वाहनावरील चालक सचिन श्रीकिसन तायडे (वय ३२ रा. मंगळूर नवघरे ता. चिखली जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आशिष वसंतराव हिवराळे (वय ४१ रा. अचलपूर ता. अमरावती जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली आहे.






