File Photo : Drowned
मुंबई : माहीम येथील दर्ग्यात दर्शन (Darshan In Dargah) घेण्यासाठी आलेले दोन तरुण मिठी नदीत (Mithi River) वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री माहीम खाडीवर (Mahim Creek) उभे असताना एका मित्राचा पाय घसरल्याने तो वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने धाव घेतली असता तोही वाहून गेला.
मध्यरात्री भरती (Tide) असल्याने अग्निशमन दलाला बचाव (Mumbai Fire Brigade) कार्य करता आले नाही. मात्र, पाणी ओसरताच एकाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. जावेद आणि आसिफ अशी त्यांची नावे आहेत.
कुर्ला येथील दोन तरुण जावेद आणि आसिफ माहीम दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर दोघेही मध्यरात्री घरी जात असताना शौचाला जाण्यासाठी दोघेही माहिमच्या खाडीपाशी गेले. त्यावेळी एकाचा पाय घसरून तो खाडीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने खाडीत उडी घेतील, पण तो देखील बुडाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले. पण मध्यरात्री मुंबईत मुसळधार आणि भरती असल्याने बचाव कार्य करता आले नाही. पहाटे पाणी ओसरताच एका तरुणाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला. तर, दुसऱ्याचा शोध अद्याप सुरुच आहे.