मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये अनेक हालचाली घडत आहे. राज्यामध्ये व देशामध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीचा मोठा धक्का बसला आहे. देशातील 543 जागांपैकी फक्त 240 भाजपला मिळाल्या असून राज्यातील 48 जागांपैकी फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपला सरकार बनवण्यासाठी स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. राज्यातील या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची इच्छा बोलून दाखवली. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून बाहेर पडण्यासाठी पक्षश्रेष्ठींना करणार विनंती करणार असल्याचा गौप्यस्फोट केला. यामुळे एकच खळबळ उडाली. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची विनंती करणे, म्हणजे त्यांनी सन्मानपूर्वक निरोप मागणे आहे. कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनाही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशीही चर्चा होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रात नकारात्मकता असून त्याचा फटका भाजपाला बसलेला आहे. भाजपाकडून कदाचित देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्याच्याआधी आपण स्वतःहूनच बाहेर पडावे, असा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून होत आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: On Maharastra Dy CM Devendra Fadnavis’ statement, Shiv Sena (UBT) leader Sushma Andhare says, “Devendra Ji wants a dignified exit. State BJP President Chandrashekhar Bawankule and Devendra Fadnavis had a meeting yesterday and I have come to know that… pic.twitter.com/o6TFpyckXr — ANI (@ANI) June 5, 2024
यापुढे विनोद तावडे…
पुढे त्या म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांचा राज्यामध्ये चेहरा समोर करण्यात आला होता. मात्र त्या चेहऱ्यामागे किती नकारात्मक आहे हे समोर आले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजपा देखील त्यांना यापुढे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढेही आणणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणून कुणाला प्रोजेक्ट करायचे असेल तर भाजपाकडून एकवेळ विनोद तावडे यांचे नाव पुढे केले जाऊ शकते. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुन्हा कधीच समोर येईल,” असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.