Udayanaraje Met Governor Bais What Is The Reason Behind The Visit Nrdm
उदयनराजेंनी घेतली राज्यपाल बैस यांची भेट; भेटी मागचं कारण काय?
खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी महाबळेश्वर मुक्कामी असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांच्याशी पाऊण तास सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना काही विकास कामांच्या प्रश्नांची त्यांनी मांडणी केली.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी महाबळेश्वर मुक्कामी असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांच्याशी पाऊण तास सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना काही विकास कामांच्या प्रश्नांची त्यांनी मांडणी केली. उदयनराजे यांनी त्यांना निवेदन सादर केले.
यावेळी त्यांच्या समावेत जितेंद्र खानविलकर, गणेश भोसले, विनीत पाटील, प्रीतम कळसकर उपस्थित होते.
महाराष्ट्रातसह कर्नाटक, तेलंगणा व आंध्र यांच्या राज्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे सुशोभीकरण आणि शुद्धीकरण, नमामि गंगा योजनेच्या धरतीवर नमामि कृष्णा ही योजना राबवणे, बौद्ध सर्किटच्या धर्तीवर शिवस्वराज्य सर्किट योजना मार्गी लावणे, मराठा साम्राज्याचे महत्त्वाचे किल्ले असणारे राजगड, रायगड व सातारा या तीन राजधान्यांचा सूचीबद्ध विकास करणे, पानिपत ते तंजावर त्यांच्यावर यादरम्यानच्या ऐतिहासिक स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने सुयोग्य विकास करणे, इत्यादी योजनांच्या संदर्भात निधीच्या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.
लवकरच योग्य निर्णय घेऊ
महाबळेश्वर जवळील प्रतापगड सह राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करणे महाबळेश्वर, पाचगणीच्या विकासाकरता उच्चस्तरीय सनियंत्रण समितीवर स्थानिक लोकप्रतिनिधी व नगराध्यक्ष यांची नियुक्ती करणे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अधिकृत इतिहास भारत सरकारद्वारे प्रसिद्ध करणे या विविध विषयांवर उदयनराजे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. राज्यपालांनी पाऊण तासाच्या या चर्चेमध्ये सर्व मागण्या सविस्तरपणे समजून घेत त्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
Web Title: Udayanaraje met governor bais what is the reason behind the visit nrdm