म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद
घराघरांत जाऊन उमेदवारांनी साधला संवाद
पदयात्रेदरम्यान स्थानिक पदाधिकारी आणि सामाजिक प्रतिनिधी उपस्थित
म्हाळुंगे: म्हाळुंगे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने आयोजित पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक उपविभागात नागरिकांचा (Pune) सहभाग लक्षणीय वाढताना दिसून आला. घराघरांत जाऊन संवाद साधताना नागरी सुविधा, सुरू असलेली विकासकामे आणि परिसरातील अपेक्षा यावर थेट चर्चा करण्यात आली.
या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे यांच्यासह बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हाणे आणि अमोल बालवडकर सहभागी झाले होते. नेत्यांनी नागरिकांची दारोदारी भेट घेत स्थानिक विकास, प्रशासन आणि भविष्यातील नियोजनाबाबत आपली भूमिका मांडली.
दरम्यान, याच आठवड्यात ‘विजय संकल्प यात्रे’दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपचे माजी सरपंच संपर्क प्रमुख, कोथरूड विधानसभा, काळुराम गुलाब गायकवाड, सुस–महाळुंगे प्रभागाचे भाजपचे माजी उपसरपंच व अध्यक्ष राजेंद्र भिमा पाडाळे, तसेच खंडू काशिनाथ खैरे, अनिल गायकवाड, भगवान कामठे, ओम गायकवाड आणि ओम संतोष पाडाळे यांनी या पादयात्रेत सक्रिय सहभाग घेत पक्षाला पाठिंबा दर्शवला.
पदयात्रेदरम्यान अनेक स्थानिक पदाधिकारी आणि सामाजिक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये पोलीस पाटील शांताराम पाडाळे, वामनराव कोळेकर, निलेश पाडाळे, सोपानराव खैरे, सुखदेव कोळेकर, विजय कोळेकर, नामदेवराव गोलांडे, युवराज कोळेकर, हरिश्चंद्र गायकवाड, जितेंद्र कोळेकर, राहुल दादा, किसन पारडे, काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे, नंदकुमार पाडाळे, समीर कोळेकर, किसनराव सुतार, रामराव पाडाळे, ज्ञानेश्वर पाडाळे, मनोज पाडाळे, धनराज निकळजे, आनंदराव कांबळे, प्रकाश तात्या आणि अनिल तात्या यांचा समावेश होता.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पदयात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये असलेल्या जागरूकतेचे द्योतक आहे. नागरिकांनीही या संधीचा उपयोग करत थेट उमेदवारांसमोर आपल्या समस्या, अपेक्षा आणि विकासासंबंधी सूचना मांडल्या. म्हाळुंगे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत असलेला वाढता पाठिंबा आगामी निवडणूक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.






