मुंबई : वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत विधान केले आहे. कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना संत माणूस असे म्हटले आहे. ‘उद्धव ठाकरे हे तर संत माणूस आहेत. राजकारणात कुठे येऊन अडकले. तुम्हालाही माहितीये की कशा पद्धतीने अडकले आहेत’, असे त्यांनी एका मुलाखतीत विधान केले.
भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर असताना पदमुक्त करावे यासाठी केंद्राकडे विनंती केली होती. त्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आज कोश्यारी यांनी साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे तर संत माणूस आहेत. राजकारणात कुठे येऊन अडकले. तुम्हालाही माहिती आहे की, कशा पद्धतीने अडकले आहेत. पाच पानी पत्र लिहिलं म्हणून तुम्हाला मी बोलतोय. जर माणूस साधा नसता, सज्जन नसता आणि राजकारणी असता.
…त्यांचा शकूनी मामा कोण?
भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या संबंधावर असंही म्हटलं की, माझे तर चांगले संबंध होते. पण त्यांचे सल्लागार कोण होते? त्यांचे आमदार इथे येऊन बोलायचे की आम्हाला वाचवा. उद्धव शकूनी मामाच्या जाळ्यात फसले आहेत. मला नाही माहिती त्यांचा शकूनी मामा कोण होता?, असेही त्यांनी म्हटले आहे.
रमेश बैस 20 वे राज्यपाल
संसदीय राजकारण आणि समाजकारणाचा पाच दशकांचा अनुभव असलेले रमेश बैस यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची नुकतीच शपथ घेतली. उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मूळ छत्तीसगडचे असूनही महाराष्ट्राच्या मातृभाषेत शपथ घेत त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रमेश बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत.