लोणावळा : लोणावळा ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान अप लाईनवर गुरुवारी ( दि. २० ) पहाटे विशाखापटणम एक्सप्रेसची धडक बसून एका २८ वर्षीय अज्ञात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस हवालदार एस. ई. सावंत यांनी दिली. मृत महिलेचे वर्णन पुढील प्रमाणे. अंगाने – सडपातळ , रंग – निमगोरा, दात – सफेद, कान मध्यम, डोळे – काळे, नाक – सरळ, डोक्याचे केस काळे व लांब, कपाळावर टिकलीच्या जागी गोंदलेले, उजव्या हाताच्या दंडावर मराठीत संतोष पूजा, हाताच्या पोटरीवर इंग्रजीत P अक्षर व पंजावर VDP गोंदले आहे. – मयताच्या अंगावर भगव्या रंगाचा सलवार कुर्ता आहे. या वर्णनाच्या महिलेबाबत माहिती असल्यास लोणावळा दूरक्षेत्र पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीसाकंडून करण्यात आले आहे.