नागपूर : आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर मराठा समाजावर अमानुष लाठीचार्ज झाला. राज्य सरकारची उदासीनता या घटनेला कारणीभूत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राणे समितीने घेतला. सर्वाच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेल्यावर आरक्षण रद्द करण्यात आले होते. ही लढाई आता न्यायालयीन राहिली नाही. पण गृहखात्याच्या इशाऱ्यावर हा लाठीचार्ज झाला. मराठा समाजासोबत बनवा बनवी करत आहेत. मागील महिन्यात ४ दलितांवर हल्ला झाला, वारकरी नागरिकांवर मारहाण झाली. आंदोलनाचे मोठं स्वरूप होईल म्हणून आंदोलन चिघळले असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले, १८ ते २२ च्या दरम्यान विशेष अधिवेशनात हा मुद्दा मांडून आरक्षण द्यावे. ओबीसीत आरक्षण द्यायचे असल्यास त्यात २७ टक्क्यावरून वाढ करून त्यातून द्या, आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भूमीका स्पष्ट आहे, मराठा समाजाला आमचा पाठिंबा आहे. हे गृहखात्याच अपयश आहे. आमचा विरोध नाही, ५२ टक्के ओबीसीची लोकसंख्या आहे, मराठा संख्या जोडल्यास संख्या २५ टक्के होईल, त्यामुळे आरक्षण वाढवणे ही आमची भूमिका आहे असे ते म्हणाले.
मतासाठी हा विषय सुद्धा पुढे येईल, ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटेल अशी शक्यता आहे, त्यामुळे सगळे सावध होतील, हिंदू मुस्लिम दंगा करून यश मिळत नसल्याने हा विषय आणला जाऊ शकतो, मतासाठी खेळ असू आहे. ५० टक्क्यांवर आरक्षण केल्यानं राज्य सरकारने अधिवेशन बोलावून हा ठराव पास करून केंद्राला पाठवून आरक्षण द्यावे. सर्वोच्च न्यायलयात रिव्ह्यू पिटीशन मधून काहीच होणार नाही. राजकीय इच्छाशक्तीतून मार्ग निघेल. न्यायालयाच्या लढाईतून काही होणार नाही. आता राजकारण करत आहे असे म्हणतात अर्थ नाही, घटना निंदनीय आहे, विरोधक आपली बाजू समजून घेण्यासाठी जातील. राजकीय इच्छाशक्ती असेल तरच हा विषय सुटू शकतो.