शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीची केल्याने विजय वडेट्टीवार आक्रमक (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये आमामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खड़ाजंगी होत असून अनेक आरोप केले जात आहेत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने नागपूरमध्ये अपघात झाला आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले असून संकेत बावनकुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील निशाणा साधला आहे. नागपूरमध्ये हा प्रकार झाल्यानंतर प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच जेवढ्या निवडणुका पुढे जातील तेवढ्या महायुती मागे जाईल, अशी टीका देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या पोरांना वाचवण्याचा प्रयत्न
मुंबईमध्ये विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “गुन्हेगारांना संरक्षण देणारे गृह खाते झाले आहे. नागपूरमध्ये झालेल्या अपघातामध्ये ड्रायव्हर दारू पिऊन चालू होत आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. कारवाई न करता सर्व्हे ठिकाणी आरोपी 48 तास मोकाट सोडत आहेत. अजित पवार गट यांनी सुद्धा पुण्यात केले होते. मुंबईमध्ये शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केले आणि BJP पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या मुलाने नागपुरात केले आहे . जयकुमार गोरे यांनी दोन लोकांचा जीव घेतला आहे. यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही. गाडीची नंबर प्लेट का काढून ठेवली? पोलीस पाठीशी घालत आहेत .यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या पोरांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
संजय राठोड यांनी लबाडी केली
त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी संजय राठोड यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “गोर बंजारा समाजाचे राज्याच्या लोक आयुक्त यांच्याकडे याची तक्रार केली आहे. राठोड यांच्याकडे 2200 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद असताना 8000 कोटी रुपये याचे एकूण टेंडर काढले आहेत. त्या मंत्र्याने भूखंड परत दिला पाहिजे. त्यांना आता मंत्री पदावरून काढावे. आमदार व मंत्री हे मिळेल तो भुखंड घश्यात घालण्यासाठी काम करत आहेत . संजय राठोड आणि जलसंपदा मंत्री यांनी बेलापूर मधील दीड एकर भुखंड हेराफेरी करून स्वतः त्या नावाने करून घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे. गोरबंजारा समाजासाठी हा 500 कोटींचा भूखंड आहे. 2019 का वर्गीकरण करून देण्यात आले. यात संजय राठोड यांनी लबाडी केली मंत्र्यांच्या खाजगी ps ने भुखंड संस्थेच्या वतीने ताब्यात घेतली,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस व संजय राठोड यांच्यावर केला आहे.