मुंबई : विनायक मेटे याचं काल अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) हा अपघात झाला. या अपघातात त्यांचा सुरक्षा रक्षक राम ढोबळेही जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नाही . त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील (Pune)रुबी हॉल येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
[read_also content=”लोकशाही व संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा : नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/beware-of-miscreants-who-attack-democracy-and-constitution-nana-patole-nrdm-316299.html”]
काल झालेल्या या अपघातात राम यांच्या डोक्याला व पोटाला मार लागला असल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे. ढोबळे यांना पुण्यातील (Pune)रुबी हॉल येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत फोनवरून संवाद साधला आहे.
[read_also content=”विनायक मेटेंच्या अपघातानंतरच्या घटनांची चौकशी करा, ज्योती मेंटे यांची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/jyoti-mente-demand-for-investigation-of-vinayk-mete-accident-nrps-316280.html”]
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे मेटेंचा अपघात झाला. मात्र, अपघातानंतर विनायक मेटेंना मदत तातडीने मदत मिळाली नाही. ते काही तास घटनास्थळीच पडून होते, असा आरोप मेटेंसोबत असलेल्या सहकाऱ्याने केला आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे.