this aashadhi ekadashi 2025 watch vitthal special serial and movies
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या (Ashadhi Wari) निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी (Vitthal Rukmini Temple) मोठ्या संख्येने भाविक येतात. पण आता आषाढ महिना सुरू झाल्याने वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठल आणि रखुमाईच्या भेटीचे वेध लागले आहे. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ घेता येईल, यासाठी आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत येत्या 29 जून रोजी आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 12 ते 15 लाख भाविक येतात. भाविकांना पंढरपुरात आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन व प्रशासनाकडून कामे सुरू आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी 8 व 9 जून 2023 रोजी पालखी मार्ग तसेच पंढरपूरला येथे भेट दिली. यावेळी आयोजित बैठकीत चंद्रभागा नदीपात्रात स्वच्छता ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चंद्रभागा नदीपात्रात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.
7 जुलैपर्यंत मंदिर 24 तास खुले
आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणीचा शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते, अशी प्रथा आहे. त्यानुसार आता 7 जुलैपर्यंत मंदिर 24 तास खुले असणार आहे.