कल्याण : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत कल्याण लोकसभा मतदार संघातील १४२ कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी केल्या जाणाऱ्या विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वीप कार्यक्रमाच्या अनुषंगाने १४२ – कल्याण पूर्वचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली विठ्ठलवाडी परिसरातील खडेगोळवली येथील किन्नर अस्मिता संस्थेत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर ठिकाणी तृतीयपंथी मतदारांनी आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण मतदान करा अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. आम्ही सर्व मतदान करणार या शब्दात उपस्थितांना आश्वासित केले. यासमयी स्वीप टिमचे कर्मचारी-स्टुडंट ऑयकान प्रणव देसाई, समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, मिडीया टिमचे उमेश यमगर, निलेश चव्हाण,अदिती पवार उपस्थित होते.