संग्रहित फोटो
जेजुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी १० प्रभाग असून, यातून २० उमेदवार व एक नगराध्यक्ष निवडून दिला जाणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तीन तर नगरसेवक पदासाठी ५० उमेदवार ही निवडणूक लढवीत आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी १५० आधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त
आधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी ( दि.१) सर्व तिसरे प्रशिक्षण देऊन त्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल नेता येणार नाही. केवळ मतदान केंद्राध्यक्ष व तेथील अधिकाऱ्यांना कामकाजासाठी मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
उद्या होणार मतमोजणी
बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी मतमोजणी सकाळी १० वाजता जेजुरी येथील मल्हार नाट्यगृह येथे सुरू होणार असून, मतपेट्या ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक उमेदवारांचे एक प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. निवडणूक यंत्रणेसाठी प्रशासन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शीतल मुळे तसेच निवडणूक विभागाचे बाळासाहेब खोमणे यांनी सांगितले.






