तालुक्यातील निरावागज येथे ग्रामदैवत श्री वाघेश्वरी देवीच्या यात्रेस शनिवारी (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी (दि.२५) भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना एकूण दीड लाख रुपयाची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तालुक्यातील निरावागज येथे ग्रामदैवत श्री वाघेश्वरी देवीच्या यात्रेस शनिवारी (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी (दि.२५) भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना एकूण दीड लाख रुपयाची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
कोरोनानंतर प्रथमच वाघेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय निरावागज ग्रामस्थांनी घेतला आहे. यात्रेनिमित्त शनिवारी सकाळी सहा ते नऊ या वेळेत श्री वाघेश्वरी मंदिरात विधीपूर्वक पूजा करण्यात आली. यानंतर दुपारी चार वाजता वाघेश्वरी मातेच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ९ ते १२ या वेळेत मोरोची येथील ह. भ. प. अमोल सुल महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
रविवारी रात्री ९ ते १२ या दरम्यान महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (दि.२५) दुपारी चार वाजता त्यांचा भव्य आखाडा आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना ५० हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतची एकूण रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या दिवशी रात्री ९ ते १२ या दरम्यान महाराष्ट्रभर गाजत असलेला दणका हा कार्यक्रम होणार आहे.
२ मे रोजी बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रुपये, तृतीय पारितोषिक २१ हजार रुपये, चतुर्थ पारितोषिक ११ हजार रुपये, पाचवे पारितोषिक ७ हजार रुपये, तसेच प्रत्येक पाचही विजेत्यांना चांदीची गदा देण्यात येणार आहे. यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी वाघेश्वरी यात्रा कमिटी व श्री वाघेश्वरी माता सामाजिक प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे.
Web Title: Wagheshwari yatra begins in niravagaj grand wrestling competition on monday nrka