वाल्मीक कराडला 'मकोका'; परळी पोलीस ठाण्यासमोर कराडच्या आईचा ठिय्या, प्रकृती खालावली
वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल होण्याची शक्यता होती, त्यामुळे कराड समर्थक सकाळपासूनच आक्रमक झाले आहेत. परळीमध्ये निदर्शने करण्यात येत आहे. समर्थकांनी टॉवर, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. बसवर दगडफेक करण्यात येत असल्यामुळे सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परळीत सुरू असलेल्या आंदोलनात वाल्मिक कराड यांची वृद्ध आई सहभागी झाली असून त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजताच त्यांना चक्कर आली असून प्रकृती खालावली आहे.
वाल्मीक कराड समर्थकांनी सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे यांच्या फोटोला चपाला मारो आंदोलन करत निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर परळीत सध्या तगडा बंदोबस्त असून कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. काही समर्थकांनी टायर पेटवले आहेत. एकीकडे बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले असतानाच हे आंदोलन सुरू असून बसवर दगडफेक करण्यात आली आहे.
आज कराडला केज कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कराडच्या वकिलाने जामीन मागीतला पण कोर्टाने सरकारी बाजू ऐकून घेत १४ दिवसाची कोठडी सुनावली. वाल्मीक कराडला मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. त्यानंतर परळीबंदची हाक देण्यात आली आहे. परळीमधील सर्व दुकाने बंद झाले आहेत. वाल्मीक कराड समर्थकांकडून टायर जाळत आपला रोष व्यक्त केला. परळीमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
परळी शहर अचानक कडकडीत बंद. आज मकरसंक्रांत असल्याने बाजार पेठ गर्दीने सजली होती. मात्र वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावल्याची माहिती मिळताच परळी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे बाराज पेठेसह परळी शहरात सर्वत्र शुकशुकाट आहे. यामध्ये मुख्य बाजारपेठ मोंढा,टावर,बाजार समिती रोड, बस स्टँड रोड , बंद करण्यात आला आहे.
Mahesh Kothe : महाकुंभमध्ये महाराष्ट्रातील माजी महापौरांचं निधन; शाही स्नान करताना हार्ट अटॅक
वाल्मी कराडसाठी त्याची आई मैदानात उतरली आहे. कराडच्या ७५ वर्षीय आईने परळीतील पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे. सकाळपासून आंदोलन केले. पोलीस ठाण्यासमोर हजारोंच्या संख्येने जमाव जमा झाला होता. 75 वर्षीय पारुबाई बाबुराव कराड यांनी सकाळपासून परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. दुपारी पारुबाई यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना चक्कर आली. वाल्मीक कराड यांच्या पत्नीही परळीतील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.