वर्धा पोलीस कर्मचारी अपघातात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत (फोटो - सोशल मीडिया)
वर्धा : राज्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वर्ध्यामध्ये देखील भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचे पूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये वाहन चालवताना प्राणी मध्ये आल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.
आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित झाली. त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे. यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. तर प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांची अपत्य ही केवळ तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. काल (7 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राज्यातील जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलीस दलावर आहे, त्यांच्यावरील कामाचा ताण सातत्याने वाढत आहे. राज्याची एकूण लोकसंख्या आणि उपलब्ध एकूण पोलिस दल यांचा विचार करता तब्बल एक लाख लोकसंख्येच्या रक्षणासाठी केवळ 172 पोलिस उपलब्ध आहेत, ही बाबच पोलिसांवरील वाढता ताण दर्शवणारी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी ८३ लाख इतकी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी राज्यात माहिती अधिकाराखाली प्राप्त माहितीनुसार, २०२४ च्या आकडेवारीचा विचार केला असता राज्यात प्रत्यक्ष पोलिस संख्याबळ १ लाख ९८ हजार ८७० इतके आहे. म्हणजेच एक लाख लोकसंख्येमागे १७२ पोलीस आहेत. तर महिला पोलिसांची संख्या ३६ हजार ९ इतकी असून, एकूण उपलब्ध पोलिस संख्याबळाच्या तुलनेत महिला पोलिसांचे प्रमाण १८.११ टक्के इतकेच राहिले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई महानगरीतील जनतेच्या रक्षणाचे काम ५१ हजार ३०९ अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत. मुंबईत एक लाख लोकसंख्येमागे पोलिसांचे प्रमाण केवळ २७० इतकी आहे. देशाचा विचार करता देशाची एकूण लोकसंख्या आणि तैनात पोलिस दल विचारात घेता देशात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या निकषानुसार हे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे किमान २२२ इतके असणे आवश्यक आहे.