वर्धा : बहिणी-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. सख्या भावाने बहिणीवर अत्याचार (Wardha Rape News) संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पिडिता गरोदर राहिल्यामुळे हे प्रकरण समोर आलं. या प्रकरणीअल्पवयीन आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जातो आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसापासून महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. दिल्ली, पुणे येथे सामुहिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच वर्ध्यातून काळीज हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडलीय. वर्धा शहरात सख्ख्या भावानेच बहिणीचे शोषण केलं. आई वडिल बाहेर कामानिमीत्त गेले होते. ही संधी साधून १७ वर्षीय भावाने १५ वर्षीय अल्पवयीन बहिनीचं शोषण केलं. दरम्यान, आता काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला सेवाग्राम रुग्णालयात नेलं. त्यावेळी ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर घरच्यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली. वर्धा शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने या घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
[read_also content=”केंद्र सरकारनं आणखी एक ‘ही’ सरकारी कंपनी विकली, कंपनी रतन टाटांनी घेतली विकत https://www.navarashtra.com/india/another-government-company-was-sold-by-the-central-government-the-company-was-bought-by-ratan-tata-307885.html”]