नागपूर : हिवाळी अधिवेशनातील उद्या अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्यामुळं उद्या सूप वाजणार आहे. अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होत, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताहेत. दरम्यान, अधिवेशनाच्य पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक होत सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. दरम्यान, आज देखील विरोधकांनी मंत्र्यांचे राजीनाम्यावरुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे सीमावाद, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, राहुल शेवाळे, मंत्र्यांचे घोटाळे तसेच अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आमनेसामने येताहेत.
[read_also content=”गायरान जमीन वाटप प्रकरणी मंत्र्यांची सखोल चौकशी करा, चौकशी होईपर्यंत मंत्रीपदाचा राजीनामा घ्या; विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी…आणखी ‘हे मंत्रीही’ आहेत रडारवर? https://www.navarashtra.com/maharashtra/investigate-the-minister-thoroughly-in-the-gayran-land-allotment-case-resign-from-the-ministerial-post-pending-the-inquiry-opposition-leader-ajit-pawar-demand-357852.html”]
दरम्यान, घोटाळेबाज मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज ठाकरे गटाचेप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, शिंदे गटातील घोटाळेबाज मंत्री तसेच सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दोन आठवडे हिवाळी अधिवेशन सुरु आहे, सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडलाय, महाराष्ट्राच्या जनतेला काय दिलं, याचं उत्तर दिलं पाहिजे. ५२ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांना मान्यता, याची अंमलबजावणी कशी होणार, याची अनिश्चितता आहे. रोज एक-एक मंत्र्यांच्या घोटाळ्यांबाबत आरोप झालेले आहेत. आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले नाहीत. गेल्या ६ महिन्यांत सरकार काय करतंय, हे लोकांसमोर आलंय का? घोटाळेबाज मंत्र्यांचे राजीनाम घेणार की, क्लिन चीट देणार, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
पुढे बोलताना उदधव ठाकरे म्हणाले की, विदर्भाला काय देणार, याचं उत्तर मिळालेलं नाही. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेले नाहीत. नेमक्या काही ठोस योजना अजूनही घोषित झालेल्या नाहीत. विदर्भ त्याची अपेक्षा करतोय. सरकारनं विदर्भासाठी, महाराष्ट्रासाठी काही योजना जाहीर कराव्यात. एनआयटीपासून घोटाळ्यांबाबत प्रकरणावर काय करणार? आरोपांबाबत क्लीन चिट देणार का, की आरोप करणाऱ्यांची चौकशी करणार का? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली.