File Photo : Landslide
पुणे : खालापूर येथील इर्शाळगडाच्या (Irshalgad Fort) पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या दरडीच्या (Landslide) मलब्याखाली 40 घरे दबली गेली आहेत. आतापर्यंत घटनास्थळावरून 8 पेक्षा जास्त मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना घडल्याने पुन्हा एकदा दरड कोसळण्याचा मुद्दा चर्चा चर्चेत आला आहे. पण ही दरड नेमंक कोसळते तरी कशी आणि कधी याची माहिती आता दिली जात आहे.
दरड म्हणजे नेमकं काय?
दरड म्हणजे डोंगराची तीव्र कडा. असे नैसर्गिक तीव्रकडा फारच कमी असतात आणि ज्या कठीण आहेत त्या दगडांच्या आहे. डोंगर फोडून लोहमार्ग किंवा रस्ता बनवताना, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दरडी तयार होतात. किमान एका बाजूला दरड राहते. डोंगरातून रस्ते बनवताना बहुतांश दरडी तयार झाल्या आहेत.
दरडी केव्हा कोसळतात?
दरडी नैसर्गिक आणि कृत्रिम कारणांनी कोसळतात. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी जमीन खचते म्हणजेच भूस्खलन होते. अशा भूस्खलनावेळी दरड नैसर्गिकरित्या कोसळते. अशा घटना अपवादात्मक आहेत. मोठ्या प्रमाणात मातीचा ढिग किंवा खडक फुटून कडा कोसळतो, त्यास दरड कोसळणे म्हणतात.
दगड किंवा भूभागाचे वजन वाढते अन्…
नैसर्गिकरित्या कठीण पाषाणात असणाऱ्या भेगा किंवा फटी असतात. उन, वारा, पाऊस यांचा परिणाम होऊन खडकाचे तुकडे होतात. या भेगा वाढून त्यामध्ये पाणी साठले की दगडाचे किंवा भूभागाचे वजन वाढते आणि तो खडक उताराच्या बाजून घसरतो. ही नैसर्गिक दरड कोसळण्याची प्रक्रिया असते.