धनंजय मुंडेंना झालेला बेल्स पाल्सी आजार नेमकं काय खाल्ल्याने होतो? समोर आली धक्कादायक माहिती
महायुती सकारमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. सध्या त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. दरम्यान धनंजय मुंडेंना झालेला हा आजार नेमका काय? तो कशामुळे होतो? काय खाणं टाळावं? लक्षण काय? याबाबत जाणून घेऊया…
बेल्स पाल्सी हा आजार दुर्मिळ मानला जातो. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. अंशत: पक्षाघातही होतो. यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते. यामुळे तुम्हाला पापणी नीट बंद करता येत नाही. डोळा बंद करण्यात अडचणी येऊ शकतात. हसताणाही त्रास होऊ शकतो. बेल्स पाल्सी आजार फक्त प्रौढ व्यक्तींना किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो. योग्य औषधोपचार केल्यास २ ते ३ महिन्यानंतर आजाराची लक्षणे नाहीशी होतात, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.
बेल्स पाल्सी हा आजार जास्त तणाव किंवा मानसिक दडपणामुळे होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. थंडी लागणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो. मधुमेह किंवा इतर काही आरोग्य समस्या असलेल्या रुग्णांमध्येही या आजाराची लक्षणं जाणवू शकतात. विशेष म्हणजे जेवणात मीठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे हा आजार उद्भवू शकतो. मिठाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. स्ट्रोक हे चेहऱ्यावर येणाऱ्या पक्षाघाताचे मुख्य कारण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा
डोळे आणि तोंड व्यवस्थित बंद न होणं
बोलताना किंवा खाताना अडचणी येतात
चेहऱ्यावर मुंग्या येणे किंवा चेहरा सुन्न होणे
अन्नाची चव समजण्यास अडचणी
कानाजवळ वेदना
संवेदनशीलता वाढणे
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे घेणे
फिजिओथेरपी आणि चेहऱ्याशी संबंधित व्यायाम करणे
मालिश किंवा गरम पाण्याने शेक देणे
डोळे कोरडे पडू नयेत म्हणून आयड्रॉप वापरणे
बेल्स पाल्सी काही आठवड्यांत किंवा महिन्यात आपोआप बरी होते.
डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.






