नागपूर : हिवाळी अधिवेशनातील आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आज सूप वाजणार आहे. अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होत, आमनेसामने येताहेत. दरम्यान, अधिवेशनाच्य पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक होत सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. दरम्यान, या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले. सीमावाद, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, राहुल शेवाळे, मंत्र्यांचे घोटाळे इत्यादी अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आमनेसामने येत सूडाचे व कुरघोडीचे राजकारण केल्याचे पाहिले. विरोधक मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक असून, दररोज आंदोलन करताहेत, तर आज शेवटच्या दिवशी मंत्री राजीनामा तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव तसेच नवीन बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे.
[read_also content=”सलीम फ्रुटचा डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका न्यायालयात अर्ज; पुढील आठवड्यात सुनावणी https://www.navarashtra.com/maharashtra/salim-frutt-application-for-default-bail-application-to-the-special-makoka-court-of-the-sessions-court-mumbai-hearing-next-week-357957.html”]
दरम्यान, अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी विरोधकांनी केली होती, मात्र नियोजित कालावधीतच अधिवेशन पार पडणार आहे. आज शेवटचा दिवस असल्यानं आज सूप वाजणार आहे. त्यामुळं मंत्री घोटाळ, मंत्र्यांचे राजीनामे, विधानसभा अध्यक्ष अविश्वास ठराव, आदी प्रकरणावरुन आज विरोधक व सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे मविआ नेत्यांनी याबाबतचं पत्र सोपावलं आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांकडे दिलं आहे. मविआने दिलेल्या पत्रावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत.
दरम्यान, आज काही प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा तसच विदर्भ यांच्या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री जमीन घोटाळा, तसेच अब्दुल सत्तार, उद्य सामंत, संजय राठोड, शंभूराज देसाई आदी मंत्र्यांचे घोटाळे विरोधकांनी बाहेर काढल आहेत, त्यामुळं यांच्या राजीनाम्यावरुन विरोधक आंदोलन करताहेत. तर आज विधानसभा अध्यक्षांविरोधात मविआ अविश्वास ठराव मांडणार आहेत, त्यामुळं आजचा शेवटचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.