Photo Credit : Social media
मुंबई: विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला.
पण दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या गटामुळेच जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी एक्सवरून (ट्विटर) विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. पण त्याचबरोबर ठाकरे गटावरही निशाणा साधला आहे. त्याचवेळी, असे ट्विट करत ठाकरे गट छोट्या पक्षांना संपवत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी ठाकरे गटानेच जयंत पाटील यांचा ठरवून पराभव केला, असा आरोप केला आहे. त्यामुळे आता मिलींद नार्वेकरांचा विजय आणि जयंत पाटील यांचा पराभव झाल्यामुळे आता भाजपच्या दाव्यालाही बळ आले आहे. शेलार यांनी एक्सवर ट्विट करत लिहिलं आहे की, “विधान परिषद निवडणूकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी. सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन, महाराष्ट्र पाहतोय. लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. (गम्मत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती.)
विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी !
सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !!
तर आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला. सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय? महाराष्ट्र पाहतोय! छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात.’’
विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी !
सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !!महाराष्ट्र पाहतोय…
◆लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही.
◆मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील… pic.twitter.com/4ax2PdKyMl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 13, 2024