मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटचा टप्प्यामधील निवडणुकीचा प्रचार राजकीय पक्ष करत आहेत. या शेवटच्या प्रचारासाठी तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष श्री के अन्नामलाई हे मुंबईमध्ये पोहोचले आहेत. अण्णामलाई यांनी मुंबईत राहणाऱ्या दक्षिण भारतीय समुदायामध्ये भाजपचा प्रचार केला. अण्णामलाई यांनी पियुष गोयल यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचाही त्यांनी जोरदार प्रचार केला आहे.
[read_also content=”चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना जास्त मदत मिळावी, ठाकरे गटाची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/thackeray-group-demands-more-help-for-cyclone-victims-kankavali-sindhudurg-534558.html”]
काय म्हणाले पियुष गोयल?
लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मुंबईतील जनता पीयूष गोयल यांना विकसित भारतासाठी ऐतिहासिक विजय मिळवून देईल, असा विश्वास अण्णामलाई यांनी व्यक्त केला. यावेळी पियुष गोयल यांनी अण्णामलाई यांच्या कौतुकाचा डोंगर बांधला. यावेळी पियुष गोयल म्हणाले की, तामिळनाडूमध्ये अण्णामलाई यांनी भाजपचा विस्तार केला आहे. त्याचबरोबर माधवी लता यांनी तेलंगणामध्ये भाजपचा प्रभाव वाढवला आहे. या दोन्ही नव्या चेहऱ्यांनी उत्तर मुंबईत येऊन पाठिंबा दिला आहे असे गोयल यांनी सांगितले.
It is always a delight to meet my brother Thiru @Annamalai_K. Thank you for your constant support!#AbKiBaar400Paar pic.twitter.com/7Eor2PIKWH
— Piyush Goyal (मोदी का परिवार) (@PiyushGoyal) May 17, 2024
मागील शुक्रवारी पियुष गोयल म्हणाले होते की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आणि महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेले आहे नेऊ शकतील. त्याचबरोबर पियुष गोयल यांनी सभेमध्ये मुंबईमधील सहापैकी सहा जागांवर विजय मिळेल अशी ग्वाही सुद्दा गोयल यांनी दिली आहे.