Will Sharad Pawar Decide Today Press Conference Shortly Nrab
शरद पवार आजच निर्णय घेणार? थोड्याच वेळात पत्रकार परिषद
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे पाठवण्यात आला. समितीने केलेला ठराव त्यांच्यासमोर सादर करण्यात आला.
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे पाठवण्यात आला. समितीने केलेला ठराव त्यांच्यासमोर सादर करण्यात आला. या ठरावावर आता शरद पवार विचार करणार आहेत अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. आता पाच वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. आजच शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
आजच निर्णय घेणार
राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षदी राहायचं की नाही याबाबत शरद पवार आजच निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या समितीनं पवारांचा राजीनामा नामंजूर केल्यानंतर आता पवार काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.
शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आलाय. .एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे पाठवण्यात आलाय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. समितीने केलेला ठराव त्यांच्यासमोर सादर करण्यात आला. या ठरावावर आता शरद पवार विचार करणार आहेत अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला
अजित पवार सिल्व्हर, छगन भुजबळ,सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे सिलव्हर ओकवर पोहचल्या.राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा,जितेंद्र आव्हाड सिल्व्हर ओक वर शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल. नरहरी झिरवल आणि राजेश टोपे सिल्व्हर जयंत पाटील, एकनाथ खडसे सिल्व्हर ओक वर पोहचले. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सिल्व्हर ओक वर पोहचत आहेत
Web Title: Will sharad pawar decide today press conference shortly nrab