नाशिक : सारथीच्या माध्यमातून मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या तरुणांना दिशा मिळते आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे सारथीमुळे विविध स्पर्धा परिक्षांमधून ५० विद्यार्थ्यांची आज देशाच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी पदांवर निवड झाली आहे. सारथीच्या जडण-घडणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान व पाठबळ असून, त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानले पाहिजेत. सारथीच्या योजना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केले.
[read_also content=”मनसेच्या ‘दिपोत्सवा’चे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन https://www.navarashtra.com/maharashtra/inauguration-of-mns-dipotsava-by-cm-shinde-and-dcm-fadnavis-338310.html”]
दरम्यान, मुख्यमंत्री बोलताना सारथीच्या माध्यमातून तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, तसेच ‘सारथी’च्या उपक्रमांसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. व्यापक जनहितासाठी काम करत असताना प्रसंगी कुठलेही धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली तरी ते घेण्याची तयारी असल्याचे सांगून, जे मराठा समाजातील तरुण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवूनही नियुक्तीपासून वंचित होते, त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली आहेत. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही शक्य आहे. ते शासन करत राहील, असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्याचे मंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र किशोर दराडे, दिलीप बनकर, ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, संभाजीराजे छत्रपती, सारथीचे अध्यक्ष मधुकर कोकाटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, उपवियवस्थापकीय संचालक नितीन गावंडे तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारथीचे अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी केले.






