Akshay Kumar Shilpa Shetty Suniel Shetty Iconic Movie Dhadkan To Re Release In Theatres On This Date
सध्या बॉलिवूडमध्ये जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू आहे. अभिनेता सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘धड़कन’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडचा आयकॉनिक चित्रपट म्हणून चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलेला पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, पण प्रेक्षकांना हा चित्रपट डिजिटली रिमास्टर आवृत्तीत पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया अक्षय आणि शिल्पाचा हा चित्रपट कधी आणि कसा पाहायला मिळणार आहे…
‘सितारे जमीन पर’ला का केलं जातंय बॉयकॉट, नेमकं कारण काय ?
२००० साली प्रदर्शित झालेला ‘धड़कन’ हा त्या काळातील एक सुपरहिट चित्रपट होता, ज्याने प्रेम, त्याग आणि कुटुंब यांचे संमिश्रण असलेल्या कथेने प्रेक्षकांना प्रभावित केले. आता हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिजिटली रिमास्टर असलेल्या या आवृत्तीमुळे प्रेक्षकांना तो पुन्हा मोठ्या पडद्यावर पिक्चर क्वालिटी आणि साऊंड क्वालिटीमध्ये पाहता येणार आहे. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
‘आमचे नाते तसेच आहे…’, अरमान मलिक पहिल्यांदाच भाऊ अमालबद्दल झाला व्यक्त, चाहत्यांना दिली गुड न्यूज
‘धडकन’ हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टीने ‘अंजली’ची भूमिका साकारलीये. तर, सुनील शेट्टीने तिचा प्रियकर ‘देव’ची भूमिका साकारली होती. तर, अक्षय कुमारने शिल्पाचा पती ‘राम’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात किरण कुमार, कादर खान आणि परमित सेठी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. परमितची खलनायकाची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले होते.
चित्रपटाची स्टारकास्ट आणि कथेव्यतिरिक्त गाण्यांनाही खूप पसंती मिळाली होती. चित्रपटातील सर्वच गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर कायम आहेत. नदीम-श्रवण यांचे संगीत आणि समीर यांच्या गीतांनी चित्रपटाला एव्हरग्रीन बनवले. हा चित्रपट प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरला आणि कालांतराने त्याला लोकप्रियता मिळाली. २५ वर्षांनंतर ‘धडकन’चे पुनरागमन जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. चाहते नवीन प्रेक्षकांबरोबर पुन्हा एकदा त्या गोड आठवणींच्या दुनियेत रमण्यास उत्सुक आहेत. ११ ऑगस्ट २००० रोजी हा चित्रपट पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता.