अभिनेता रणबीर कपूर आणि नितेश तिवारी यांचा आगामी चित्रपट ‘रामायण’ चर्चेत आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. या चित्रपटात रणबीर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत आहे. यापूर्वी ‘केजीएफ’ स्टार यश यात रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी ते करण्यास नकार दिला. आता एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रामायणातील रावणाच्या भूमिकेसाठी खऱ्या सोन्याचे कपडे बनवले जात आहेत.
[read_also content=”‘वयाच्या 13 व्या वर्षी माझे फोटो अश्लील साईटवर लिक झाले होते’ जान्हवी कपूरचा धक्कादायक खुलासा https://www.navarashtra.com/movies/janhvi-kapoor-shocking-statement-her-photo-was-leaked-on-adult-site-nrps-535292.html”]
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रावणाने सुवर्ण लंकेत राज्य केले. त्यामुळे रावणाच्या पात्रासाठी खऱ्या सोन्याचा पोशाख तयार करण्यात येत आहे. रावणासाठी बनवले जाणारे कपडे खरे सोन्याचे आहेत. रावण हा श्रीलंकेचा राजा होता म्हणून खरे सोने वापरले जात आहे. त्या शतकात लंका सोन्याने भरलेली होती. त्यामुळे त्यांचे सर्व कपडे, जे काही वापरले जात आहे ते खरे सोन्याचे बनलेले आहेत.
यशच्या नकारानंतर नितीश तिवारीच्या रामायणमध्ये रावणाची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला यशने ‘रामायण’ सह-निर्माता म्हणून सामील होणार असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच, यशला ‘रामायण’च्या 20 ते 30 टक्के नफा मिळणार असल्याचं बोललं जातयं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितेश तिवारीच्या ‘रामायण’चा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच या पौराणिक चित्रपट ‘रामायण: पार्ट वन’चे बजेट 100 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 835 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Title: Actor who will play role of ravan were clothes made of real gold in ramayana ram nrps