Girija Oak Suffers Serious Leg Injury Actress Shared A Post On Social Media
मराठी चित्रपट आणि नाटक यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात अभिनेत्री गिरीजा गोडबोले प्रसिद्ध झाली आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या गिरीजा गोडबोले हिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत तिची हेल्थ अपडेट दिली आहे.
‘मला खूप लाज वाटते…’, आमिर खानबद्दल दर्शील सफारीचा भावनिक खुलासा, काय म्हणाला अभिनेता?
शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर गिरीजा गोडबोले हिने तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने त्या दरम्यानचे फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या गिरीजा हॉस्पिटलमध्ये पायासंबंधित उपचार घेत आहे. नेमका तिचा पाय फ्रॅक्चर कसा काय झाला ? याचं कारण अद्यापही गुलदस्त्यातही आहे. काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर गिरीजाने पाय फ्रॅक्चर असलेले फोटोज् शेअर केलेले आहेत. त्यामध्ये ती वॉकरच्या मदतीने चालताना दिसत आहे. अभिनेत्रीचा पाय फ्रॅक्चर झालेला फोटो पाहून चाहते तिच्या तब्येतीची विचारपूस करीत आहेत.
मराठी इंडस्ट्री गाजवल्यानंतर अंकुश चौधरीच्या पत्नीचं बॉलिवूडमध्ये डेब्यू, चित्रपटाचा पोस्टर रिलीज
सध्या गिरीजा गोडबोले हिच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे अभिनेत्रीला आता पुढचे काही दिवस आराम करण्यासाठी घरी राहावं लागणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. गिरिजाच्या या पोस्टखाली अभिनेत्री सारंग साठ्ये, क्रांती रेडकर, मानसी नाईक, स्पृहा वरद, प्रार्थना बेहरे, अमृता खानविलकर, सुव्रत जोशी, सुकन्या मोने, अभिजीत खांडकेकर आणि श्रेया बुगडेसह अनेक कलाकारांनी कमेंट करत अभिनेत्रीला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय अभिनेत्रीला लवकर बरं होण्यासही सांगितलं आहे.
‘त्याने ते चित्रपट निवडले…’, अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचे केले कौतुक, मुलासाठी लिहिली भावनिक नोट
गिरिजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, गिरीजा ओक- गोडबोले ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आहे. तिने मराठी नाटक आणि चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. गिरीजा शेवटची शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सध्या गिरिजाचं रंगभूमीवर ‘ठकीशी संवाद’ हे प्रायोगिक नाटक सुरू आहे. मार्च महिन्यात पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव’ या पुरस्कार सोहळ्यात तिला या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.