अभिषेक बच्चनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर निम्रत कौरने पहिल्यांदाच सोडलं मौन, अभिनेत्री म्हणाली, मी काहीही...
अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर प्रचंड चर्चा सुरु आहेत. अभिनेत्री निम्रत कौर ही अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाचं कारण मानली जात आहे. सोशल मिडीया युजर्स अभिनेत्री निम्रत कौरचं नाव अभिषेक बच्चनसोबत जोडत आहेत. त्यामुळे निम्रत गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल होत आहे. अभिषेक निम्रतसाठी ऐश्वर्या रायसोबत घटस्फोट घेत असल्याचा अंदाज सोशल मिडीया युजर्सने लावला आहे. आता या प्रकरणी निम्रत कौरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
हेदेखील वाचा- CID Season 2: नवीन ट्विस्ट घेऊन लवकरच येणार CID चा नवा अध्याय, प्रोमो सोशल मिडीयावर प्रदर्शित
अभिषेक बच्चनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर निम्रत कौरने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. या अफेअरच्या वृत्तावर अभिषेक बच्चनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र निम्रतने पहिल्यांदाच या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चनसोबतच्या अफेअरच्या वृत्तावर निम्रत कौरने अखेर मौन सोडले आहे. मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, मी काहीही करू शकते आणि तरीही लोक त्यांना काय हवे ते म्हणतील. अशा गॉसिप थांबवणे शक्य नाही आणि मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणे पसंत करते.
अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर हे सहकलाकार आहेत. या दोघांनी 2022 साली प्रदर्शित झालेल्या दसवी चित्रपटात एकत्र काम केले होते. तुषार जलोटा दिग्दर्शित या चित्रपटात निम्रतने अभिषेकच्या ऑन-स्क्रीन पत्नीची भूमिका साकारली होती. आता त्यांच्या अफेअरच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या व्हायरल होत असलेल्या बातम्यांमुळेच निम्रतला ट्रोल केलं जात आहे.
हेदेखील वाचा- हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने पहिल्या पत्नीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! पोस्ट व्हायरल
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात मतभेद आणि भांडण सुरु असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यांच्यातील भांडण टोकाला जाऊ हे दोघं घटस्फोट घेणार असंही सांगितलं जात होतं. तसेच ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळी राहत असल्याचे देखील बोललं जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अभिनेता अभिषेक निम्रतसोबत त्याच्या लग्नाबद्दल आणि पत्नी ऐश्वर्या रायसोबतच्या नात्याबद्दल बोलताना दिसत आहे. अभिषेक बच्चनने निम्रत कौरसमोर पत्नी ऐश्वर्याचे कौतुक केले होते. आपल्या पत्नीला आपली सपोर्ट सिस्टीम म्हणून वर्णन करताना तो म्हणाला होता, “माझी पत्नी या बाबतीत विलक्षण आहे. ती नेहमीच माझी भावनिक आधार बनली आहे. मी खूप भाग्यवान आहे, माझे संपूर्ण कुटुंब भाग्यवान आहे.”
निम्रत कौर सिनेविश्वातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट या चित्रपटातून निम्रतला प्रचंड लोकप्रियता मिळाली. निम्रतने पेडलर्स, द लंचबॉक्स, वन नाईट विथ द किंग, होमलँड-फाउंडेशन या चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.