ए. आर. रहमानच्या घटस्फोटानंतर बोल्ड सहकारी मोहिनी डे च्या घटस्फोटाची घोषणा, नेमकं कारण काय?
संगीतकार ए. आर. रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांनी काल रात्री उशिरा वेगळे होण्याची घोषणा केली. त्यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. आता ए. आर. रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणखी एका सेलिब्रिटीने आपल्या लाईफ पार्टनरसोबत वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. ए. आर. रहमानच्या म्युझिक टीममधील बेसिस्ट मोहिनी डेने सुद्धा आपल्या पतीपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
आर्यन खानच्या पदार्पणावर कंगना रणौतने मांडले मत, किंग खानच्या मुलाचे कौतुक करून इतरांना दिले टोमणे!
मोहिनी डे ही इंडियन बास प्लेयर आहे. तिने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना हा धक्का दिला आहे. मोहिनीने आपल्या आयुष्यात महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर तिच्या प्रायव्हसी जपण्यास सांगितले आहे. मोहिनी डेच्या पतीचे नाव मार्क हार्टसच असं नाव आहे. मार्क हार्टसचसोबत घटस्फोट घेताना मोहिनीने सांगितले की, “मी आणि मार्कने एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघांनीही हा घेतलेला निर्णय सांगताना मला फार दु:ख होत आहे. घटस्फोटाचा निर्णय आम्ही दोघांनीही कुटुंब आणि मित्र परिवार या सर्वांचा विचार करून परस्पर संमतीने घेतला आहे.”
“जरीही आम्ही एकमेकांपासून घटस्फोट घेतला असला तरीही, आम्ही कायमच एकमेकांचे मित्र म्हणून एकमेकांसोबत राहणार आहोत. दोघांनाही आपआपल्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या असल्याने एकमेकांच्या भावनांचा आदर करून आणि संमतीने आम्ही निर्णय घेण्याचे ठरवले. आम्ही काही गोष्टींसाठी एकत्र काम करणार आहोत. मामोगी आणि मोहिनी डे ग्रुपचं काम आम्ही एकत्र करत राहू. आम्ही पूर्वीही एकत्र क्वालिटी काम केल्यामुळे आम्हाला एकमेकांचा अभिमान आहे, त्यामुळे आमचं एकत्र काम बंद पडणार नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेमही महत्वाची गोष्ट असते. चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानते.”
किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, नव्या वेब सीरिजची केली घोषणा!
पोस्टच्या शेवटच्या भागात मोहिनी म्हणते, “माझ्या आणि मार्कच्या निर्णयाचा आदर ठेवा, आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. या निर्णयाचा सकारात्मकतेने विचार करा. या निर्णयावरुन कोणतेही अंदाज लावू नका. आम्ही हा निर्णय घाई गडबडीत घेतलेला नाही. “२९ वर्षीय मोहिनी डे मुळची कोलकात्याची आहे. ती इंडिन बास प्लेयर असून तिने आपल्या करियरमध्ये गायक ए. आर. रहमानसोबत जगभरात झालेल्या ४० पेक्षा जास्त शोमध्ये एकत्र काम केले आहे. ए. आर. रहमानने त्याच्या घटस्फोटाची घोषणा नाही केली तिच काही तासांनंतर त्याच्या टीममधील मोहिनीनेही आपल्या पतीसोबत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. ए. आर. रहमानच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे चाहते त्या धक्क्यातून सावरायच्या आतच त्याच्या टीममधल्या मोहिनी डेनेही घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलंय. दोघांनी एक दिवसाच्या फरकाने घटस्फोटाची घोषणा केल्याने चाहत्यांच्या मनात आणि संगीत क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.