फोटो सौजन्य: सोशल मीडिया
गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबीय कमालीचे चर्चेत आहे. त्याचं कारण ठरलंय, अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा… सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेकमधील वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा होत आहे. पण अद्याप दोघांनीही घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. अशा परिस्थितीत ऐश्वर्याने रस्त्यावर होणाऱ्या महिलांवर छेडछाडीवर आणि स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचारांवर व्हिडिओच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे.
सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ते प्रसिद्ध अभिनेता, अक्षय आठरेचा प्रेरणादायी प्रवास युवकांसाठी ठरतोय आयडॉल
ऐश्वर्याने तिच्या खासगी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर कमालीचा चर्चेत आला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने घर, सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे. ऐश्वर्याने हा व्हिडिओ एका बड्या कॉस्मेटिक ब्रँडच्या जाहिरातीसाठी केलेला आहे. तसंच ऐश्वर्या त्या ब्रँडची ब्रँड ॲम्बेसिडर सुद्धा आहे. २५ नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधत ऐश्वर्याने तो व्हिडिओ शेअर केला आहे.
प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती
व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय म्हणतेय, “रस्त्यावर चालताना किंवा फिरताना महिलांची छेड काढली जाते. होणाऱ्या छेडछाडीचा सामना कसा करावा? नजर झुकवायची? नाही. थेट त्याकडे पाहा. ताठ मानेनं चाला. आपलं शरीर अमूल्य आहे, त्यामुळे त्याबद्दल कधीच तडजोड करू नका. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःसाठी उभ्या राहा. तुमच्या ड्रेस किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका. ‘स्ट्रीट हरॅसमेंट’ ही कधीच तुमची चूक नसते.” असं ऐश्वर्या राय या व्हिडीओत म्हणतेय. ऐश्वर्या या व्हिडिओच्या माध्यमातून फॅन्सला महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात बोला… असं आवाहन चाहत्यांना करताना दिसतेय. अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर सहमत असल्याच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
ऐश्वर्या रायच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्याने जे व्हिडीओत म्हटलंय, त्याचं अनेकांनी समर्थन केलं आहे. ती जे म्हणतेय ते पूर्णपणे बरोबर आहे, अशा कमेंट्स करत तिला प्रतिसाद दिला आहे.