'बिग बॉस'ची ट्रॉफी आणि महाराष्ट्राचं सूरज चव्हाणने जिंकलं मन, आता उपमुख्यमंत्री अजित पवार करणार अजून एक स्वप्नं साकार
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण झाला आहे. सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर त्याच्यावर अख्ख्या महाराष्ट्राने कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत त्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळेंसह काही आमदारांनी आणि खासदारांनी त्यांचं कौतुक केलं.
हे देखील वाचा – भूल भुलैयाची १७ वर्षे, विद्या बालनच्या मंजुलिकाची अजूनही क्रेझ
अशातच आज अभिनेता आणि बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली आहे. भेटीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सूरजचे कौतुक केले असून त्याला एक मोठं गिफ्टही दिलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “सुरज चव्हाण हा एका गरीब कुटुंबात जन्मलेला तरूण आहे, मोठ कुटुंब आहे. आई वडील लवकर गेल्याने शिक्षण घेता आलं नाही. आपल्या ग्रामीण भागातल्या शाळा आपल्याला महिती आहेत. शिक्षणाच्या बाबतीत मागे राहिला पण रिल्स बनवून तो फेमस झाला आणि बिग बॉस मधून त्याला बोलावलं गेलं. सुरज बिंधास्त आहे, त्याच्या स्वावभवामुळे तो बऱ्याच जणांना भावला आणि तो सगळ्यांत मिळून मिसळून राहिला…”
“माझ्याच गावचा तो मुलगा आहे. मी त्याची पूर्ण महिती घेतली, घरकुल योजनेत त्याला घर मिळालं आहे. पण त्याला आता आम्ही चांगलं घर बांधून देणार आहोत. त्याच्या हक्काचं घर त्याला देवू. त्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्यात त्याला मदत करू. मी रितेशशी देखील बोलणार आहे. याचं आयुष्य योग्य मार्गी लागावं ही भावना, त्यावर योग्य लक्ष देवू. मी अलीकडच्या काळात निवडणुकीच्या गडबडीत होतो, पण मी बिग बॉस मराठी थोडं फार बघत होतो ते ही सुरजसाठी… आम्हाला वाटत होतं की तो नक्की बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल आणि तो जिंकला…”






