खडकवासला क्षेत्रात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त (फोटो- istockphoto)
पुणे: सलग पाचव्या दिवशीही खडकवासला धरणाच्या डाव्या तीरावरील बहुली–एनडीए रस्त्यावर जलसंपदा विभागाने शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) अतिक्रमणांवर धडक कारवाई केली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात करण्यात आलेल्या या मोहिमेत कुडजे आणि परिसरातील अंदाजे १५ हजार चौरस फूट क्षेत्रावरील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे बंगल्यांचे, रिसॉर्ट व फार्महाऊसच्या मालकांमध्ये एकच खळबळ उडाली.
जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर-फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच जेसीबी मशीन, सशस्त्र पोलिस आणि शंभरांहून अधिक मजूरांच्या साहाय्याने ही मोहीम राबवण्यात आली. स्थानिक हॉटेल व फार्महाऊस मालकांनी कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र अधिकाऱ्यांनी कोणतीही शिथिलता न दाखवता अतिक्रमणे जमीनदोस्त केली.या कारवाईत उत्तमनगर पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी, बारा पोलिस जवान तसेच मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी आदेशानुसार मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आली.
जलसंपदा विभागाच्या मालकीचे कोट्यवधींचे क्षेत्र पुन्हा ताब्यात
गिरीजा कल्याणकर-फुटाणे म्हणाल्या, धरणक्षेत्रातील कुडजे परिसरात दीर्घकाळापासून मुरुम व दगडांचे भराव टाकून बेकायदा उभारलेली बांधकामे हटवण्यात आली आहेत. सरकारी जमिनी मुक्त करून जलसंपदा विभागाच्या मालकीचे कोट्यवधी रुपये किंमतीचे क्षेत्र पुन्हा ताब्यात घेतले आहे.धरणाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणावरील निर्णायक कारवाई होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिक्रमण हटवली जात असल्याचे पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान काही ठिकाणी बांधकाममालक आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती मिळाली आहे.
नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई
विमा प्रमाणपत्र, क्षमतेपेक्षा जास्त भार वाहतूक, परवाना, अनुज्ञप्ती आदी वैध कागदपत्रांशिवाय तसेच अवैध प्रवासी वाहतूक अशा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गेल्या चार महिन्यांत मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत एकूण १ हजार ७९२ बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६०८ बसेस दोषी आढळल्या असून त्यांच्याकडून ६७ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
आरटीओ विभागाकडून पुणे जिल्ह्यात नियमितपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून तपासणी मोहीम राबवली जाते. यामध्ये योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने, परवाना नूतनीकरण न केलेली वाहने, विमा प्रमाणपत्र नसलेली वाहने, तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने अशा अनेक बाबींची काटेकोरपणे तपासणी केली जाते.






