Alia Bhatt And Ranbir Kapoor Urge Paps Not To Promote Unauthorized Images Of Raha
बॉलिवूड स्टारकिड्समधलं सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे राहा कपूर… अवघ्या काही वर्षांचीच असलेल्या राहाने आपल्या ओव्हरलोड क्यूटनेसने सर्वांचेच लक्ष वेधलेय. २०२३ साली ख्रिसमसच्याच मुहूर्तावर आलिया आणि रणबीरने आपल्या चाहत्यांना लेक राहाचा चेहरा दाखवला होता. तिच्या क्यूटनेसची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते. दरम्यान, आलिया आणि रणबीरने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माध्यमांसोबत संवाद साधत एक महत्वाची माहिती दिली आहे. दरम्यान, आलिया आणि रणबीरने पापाराझींसोबत संवाद साधताना आपल्या मुलीचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे.
मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण, कोणकोणत्या सेलिब्रिटींनी लुटला आनंद
गेल्या काही दिवसांपूर्वी, सैफ अली खानवर एका हल्लेखोराने वांद्रातील त्यांच्या घरात घुसून हल्ला केला होता. त्या हल्ल्यावेळी हल्लेखोराने अभिनेत्याचा मुलगा तैमुर अली खानला लक्ष्य केल्याचे बोलले जात होते. पण अभिनेत्याच्या सावधगिरीमुळे त्याचे जीव वाचले. दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचप्रमाणे आलिया आणि रणबीरनेही कठोर पाऊलं उचलली आहेत. अभिनेत्रीने आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माध्यमांसोबत संवाद साधताना यापुढे राहाचे फोटो न काढण्याचे तिने त्यांच्याकडे विनंती केली आहे. आलियाचा उद्या वाढदिवस आहे. प्री- बर्थडे सेलिब्रेशनमध्ये अभिनेत्रीने पापाराझींना फोटो न काढण्याचे आवाहन केले आहे.
कियारा अडवाणीला तिच्या मुलीमध्ये हवेत करीना कपूरचे ‘हे’ ३ गुण, म्हणाली…
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी मीडियाला कॉल करून अभिनेत्रीच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये राहाचे फोटो क्लिक करू नयेत अशी विनंती केली. जर कोणी कुटुंबाचा फोटो क्लिक केला असेल तर कृपया त्यांनी तो फोटो पोस्ट करु नये, असं त्यांनी सांगितले आहे. आलिया भट्टने सांगितले की, “सैफच्या घटनेनंतर मला माझ्या मुलीबद्दल भीती आणि असुरक्षितता वाटत आहे. आता आम्ही लवकरच आमच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहोत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की, घरासमोर उभे राहून फोटो काढू नका. राहा एका विशिष्ट वयापर्यंत मोठी झाल्यावर तिचे फोटो क्लिक करायचे की नाही हे आम्ही ठरवू. शिवाय, तिचे फोटो सोशल मीडियावर दिसावा किंवा लोकांनी त्यावर कमेंट करावी असे मला वाटत नाही.”
प्रधानजींवर गोळी कोणी झाडली ? ‘पंचायत ४’ वेबसीरीज रिलीज केव्हा होणार ? समोर आली महत्वाची अपडेट
आलिया शेवटची ‘जिगरा’ सिनेमात दिसली होती. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन वासन बाला यांनी केलं होतं. तर चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि आलिया भट्ट यांनी केलं आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये विकी कौशल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.