Alia Bhatt Tribute To Indian Soldiers Says Behind Every Uniform Is Mother Who Has Not Slept
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला विशेष ओळखीची गरज नाही. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या आलियाने सोशल मीडियावर आज भारतासाठी आणि भारतीय सैन्यासाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, आलियाला या पोस्टनंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारतीय लष्कराने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. एअर स्ट्राईक करून भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील ९ अड्डे उद्ध्वस्त केले. या सगळ्यानंतर तीन दिवस म्हणजेच १० मे पर्यंत हा संघर्ष सुरु होता.
अनुष्का शर्माचा ‘Chakda Xpress’ अडचणीत? चित्रपटाबद्दल काय म्हणाली झुलन गोस्वामी?
शेअर केलेल्या पोस्टमध्ये आलियाने लिहिलेय की, “गेल्या काही रात्र नेहमीपेक्षा फार वेगळ्या होत्या. जेव्हा एखादा देश श्वास रोखून धरतो, तेव्हा हवेत एक प्रकारची शांतता असते आणि ती शांतता गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जाणवत आहे. प्रत्येक घरात डिनर टेबलवर, बातम्यांवर आणि एकमेकांच्या संभाषणात ती एक प्रकारची शांतता आणि सतावणारी चिंता दिसत होती. देशाच्या वेगवेगळ्या भागात आणि पर्वतरांगांमध्ये आपले सैनिक आपल्यासाठी सतर्क राहून लढा देत आहेत, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात आहे. आपण घरात असताना, काही पुरुष आणि स्त्रिया अंधारात उभे असतात, ज्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपू शकतो. ”
“लग्न करण्यासाठी आईने माझ्यावर…”, ‘तारक मेहता का…’ फेम बबिताचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
“देशाचे नागरिक घरात सुरक्षित झोपावं म्हणून अनेक धाडसी पुरुष आणि महिला जीव धोक्यात घालून तिकडे गस्त घालत होते. हे सत्य खरोखरंच काळजाला भिडणारं आहे. हे फक्त शौर्य नाही तर योगदान आहे. आणि प्रत्येक वर्दीच्या मागे त्यांची आई आहे जी एकही रात्र झोपू शकलेली नाही. त्या आईला याची जाणीव आहे की तिचं मूल कधी काय होईल माहित नाही अशा भयावह रात्रीचा सामना करत आहे. आपण सर्वांनीच रविवारी मदर्स डे साजरा केला. आपण आईला फुलं देतो, तिला आपण मिठीही मारतो, तेव्हा नकळत त्या मातांचा विचार येतो ज्यांनी खऱ्या नायकाला घडवलं आहे. त्या सगळ्या मातांचा खूप अभिमान वाटतो.”
‘फियर द वॉकिंग डेड’ फेम Samuel French चे निधन; ‘या’ गंभीर आजाराने घेतला अभिनेत्याचा जीव!
“आज ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलंय त्यांचं नाव प्रत्येकाच्या मनावर कोरलं गेलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी संपूर्ण देश आहे आणि त्यांना पुढील आयुष्य जगण्यासाठी बळ मिळो… यापुढे तणाव कमी होऊन सर्वत्र शांतता निर्माण होवो अशी प्रार्थना करते. आज असंख्य सैनिकांच्या पालकांनी प्रार्थना करून त्यांचे अश्रू रोखून धरले आहेत… तुमची ही शक्तीच या देशासाठी सर्वकाही आहे. या कठीण काळात आपण सगळे आपल्या संरक्षकांमुळे एकत्र आहोत… आपल्या भारतासाठी आपण एकत्र लढतोय… जय हिंद!” अशी पोस्ट आलिया भट्टने शेअर केली आहे. सध्या आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तुरुंगात Tory Lanez वर प्राणघातक हल्ला, १४ वेळा चाकूने वार; आता कशी आहे रॅपरची तब्येत?
फार उशिरा आलियाने भारत- पाकिस्तान युद्धावर भाष्य केल्याने तिला नेटकरी ट्रोल करीत आहेत. “इतक्या दिवसांपासून तणाव सुरु आहे, फार लवकर पोस्ट शेअर केलीस…”, “हे खरे सेलिब्रिटी नाहीत, खरे सेलिब्रिटी देशाचे सैनिक आहेत.”, “तिने ही आता PR मुळे पोस्ट शेअर केलेली आहे… ही पोस्ट पण पीआरनेच लिहिलेली असेल”, “अनफॉलो केलं पाहिजे”, “आलियाला खूप लवकर जाग आलीये”, “अचानक कशी जाग आली आलिया?” अशा असंख्य कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर आल्या आहेत.