बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या (Aaradhya)हिची कायम चर्चा सुरु असते. आराध्या बच्चनने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही तरी देखील तिची लोकप्रियता कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नाही. काही दिवसांपूर्वी आराध्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Aaradhya And Amitabh Bachchan Viral Photo) झाले आहेत.
[read_also content=”शरिराबरोबरच चेहऱ्याचीही चरबी करा कमी; दिसाल अधिकच तरूण, ‘या’ टिप्स देतील चमत्कारीक फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/remove-facial-fat-these-tips-will-be-useful-nrak-259603/”]
आराध्याचे व्व्हायरल झालेले हे फोटो तिच्या फॅन अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. आराध्या जवळपास ५ ते ६ वर्षांची असतानाचे हे फोटो आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अमिताभ यांच्यासोबत आराध्या पकडापकडी खेळताना दिसत आहे. यात आराध्या पुढे धावत असून अमिताभ तिच्या मागे धावत आहेत. आराध्या आणि अमिताभ यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तर त्यांचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.