अंकिता लोखंडेचं खरं नाव माहितीये का? फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी केलेला नावात बदल
झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून लोकप्रितेच्या शिखरावर पोहचलेली अंकिता लोखंडे आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक रिॲलिटी शो, टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणाऱ्या अंकिताने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनेत्रीने ‘बिग बॉस १७’ मध्येही सहभाग घेतला होता. तिने ‘बिग बॉस १७’मध्ये टॉप ५ मध्ये आपलं स्थान पक्कं केलं होतं, पण तिला फायनलिस्टची ट्रॉफी मिळाली नाही.
शर्वरी वाघ बनली गोदरेज प्रोफेशनलचा चेहरा; नेटकऱ्यांनी केलं सौंदर्याचं कौतुक
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता बॉलिवूडमध्ये देखील आपले नाव कमवत आहे. मात्र, अंकिताचं खरं नाव अंकिता नसून वेगळंच आहे. ज्यावेळी तिने इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं त्यावेळी तिने स्वतःचं नाव बदलून घेतलं. अंकिता लोखंडेला खरी प्रसिद्धी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेने दिली. पण मालिकेत तिचं ‘अर्चना’ असं नाव होतं. घराघरातून प्रसिद्धीझोतात राहिलेल्या अंकिताचं खरं नाव तनुजा लोखंडे असं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अंकिताने तिचं नाव बदलले होते. तिच्याही घरात तिला अंकिता ह्या नावाने हाक मारली जायची. म्हणूनच तिने खऱ्या नावाऐवजी याच नावाने मनोरंजन विश्वात येण्याचा निर्णय घेतला होता.
खरंतर अंकिताला केव्हाच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण, ती ओघाओघाने ती या क्षेत्राकडे वळाली. अंकिता लोखंडेला अभिनेत्री बनण्याऐवजी एअर होस्टेस व्हायचे होते. त्यासाठी तिने फ्रँकफिन अकादमीत प्रवेशही घेतला होता. त्याच दरम्यान ती राहत असलेल्या इंदूरमध्ये झी- सिनेस्टारच्या एका मालिकेच्या कलाकारांसाठी ऑडिशन ठेवण्यात आल्या होत्या. त्यात तिने आपले नशीब आजमावले आणि तिची निवड झाली. तेव्हापासून तिच्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तिने हळूहळू अभिनयाबद्दल विचार करायला सुरुवात केली. त्यानंतर २००४ मध्ये अंकिता मुंबईत आली आणि तिने मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेतली. अंकिता लोखंडे ‘बाली उमर को सलाम’ या शोमधून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पण तिचा तो शो केव्हाच टेलिकास्ट झाला नाही.
जागतिक स्तरावर पोहचलेल्या छाया कदमचा न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज…
त्यानंतर अंकिताला एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. त्या मालिकेत अभिनेत्रीने अर्चनाच्या भूमिकेतून स्वत:ची वेगळी ओळख मिळवली. अनेक वर्षे टीव्हीवर काम केल्यानंतर अंकिताने ‘मणिकर्णिका’ या बॉलिवूड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात ती कंगना रणौतसोबत दिसली होती. कंगनाच्या या चित्रपटानंतर ती ‘बागी ३’मध्ये झळकली होती. त्यानंतर अभिनेत्रीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातही काम केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती कोणत्याही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. दरम्यान, इंदूरमधील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या अंकिताचं ‘पवित्र रिश्ता’ मालिकेनंतर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतसोबत नाव जोडलं गेलं होतं. पण त्यांचं २०१६ मध्ये ब्रेकअप झालं.
सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता तुटली होती आणि अशा परिस्थितीत विकी जैन तिचा आधार बनला. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि २०१९ मध्ये विकीने अंकिताला लग्नासाठी प्रपोज केले. विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचे डिसेंबर २०२१ मध्ये विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघेही ‘स्मार्ट जोडी’ शोमध्ये एकत्र दिसले आणि त्याचे विजेते ठरले.
प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी दिसणार कधीही न पाहिलेल्या अंदाजात, ‘जिलबी’चा दमदार टिझर प्रदर्शित