गायक अरमान मलिक (Armaan Malik Engagement) आणि फॅशन इन्फ्लुएंसर आशना श्रॉफ (Fashion Influencer Aashna Shroff) यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. आता या डेंटीगच्या बातम्यांना पुर्णविराम मिळाला असून अरमाने त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत एंगेजमेंट केली आहे. या खास क्षणाचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यावर टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, झरीन खान, रिया चक्रवर्ती, इशान खट्टर असे सर्व सेलिब्रिटी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
[read_also content=”नराधमाचं नाव सांगत सामूहिक अत्याचार पिडितेनं सोडला जीव, गाझियाबादच्या पॅाश सोसायटीमध्ये तीन जणांचं महिला सुरक्षा रक्षकासोबत भयानक कृत्य! https://www.navarashtra.com/crime/woman-security-guard-gang-raped-in-basement-of-society-in-ghaziabad-nrps-450658.html”]
सोमवारी अरमान मलिकने त्याच्या इन्स्टा हँडलवरून त्याच्या साक्षगंधाच्या सोहळ्याचे सुंदर फोटो शेअर केले . पहिल्या चित्रात, ऑफ-व्हाइट सूट घातलेला अरमान गुडघे टेकून आशनाच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे. दुसरीकडे, आशना तिचा आनंद आवरू शकली नाही. आशनाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती पांढऱ्या ड्रेसमध्ये लाल फ्लोरल प्रिंटसह दिसत आहे. हे रोमँटिक फोटो पाहून अरमान मलिकचे सर्व मित्र आणि सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देऊ लागले.
इशान खट्टरने लिहिले की, ‘तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन.’ त्याचवेळी रिया चक्रवर्तीनेही या जोडप्याचे अभिनंदन केले. या एपिसोडमध्ये ईशा गुप्ता, झरीन खान, नीती मोहन, तारा सुतारिया, आहाना कुमरा ते टायगर श्रॉफ यांसारख्या स्टार्सनी त्याला खूप शुभेच्छा दिल्या.
‘बोल दो ना जरा’ आणि ‘पहेला प्यार’ सारखी लोकप्रिय गाणी गाणारा गायक अरमान मलिक तरुणामध्ये फार लोकप्रिय आहे. त्याने ‘जय हो’, ‘नैना’ सारखी अनेक चार्टबस्टर गाणी गायली आहेत. तर, आशना श्रॉफ एक लोकप्रिय फॅशन, ट्रॅव्हल ब्लॉगर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. तिची हटके शैली लोकांना खूप आवडते. आशनाचे जवळपास 1 मिलियन फॉलोवर आहेत.






