यामी गौतम स्टारर ‘आर्टिकल 370’ ला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत सर्वांनी कौतुक केले आहे. या चित्रपटात यामीसोबत प्रियामणी मुख्य भूमिकेत आहे. यामीचा पती आणि चित्रपट निर्माता आदित्य धर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता पहिल्या दिवशीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार हे पाहण्यासाठी सगळ्यांना पहिल्या दिवसाच्या कमाईची प्रतीक्षा होती. आता कलम ३७० चा बॉक्स ऑफिस रिपोर्टही (Article 370 Box Office Day 1) आला आहे.
[read_also content=”धक्कादायक! लग्नाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या टीव्ही अँकरचं एका तरुणीनं केलं अपहण, मॅट्रोमोनी वेबसाईटवरुन झाली होती ओळख https://www.navarashtra.com/crime/hyderabad-woman-arrested-for-abducting-tv-anchor-in-bizarre-attempt-to-marry-him-nrps-509906.html”]
सॅकनिकच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.75 कोटींची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटानं काश्मीर फाइल्सला मागे टाकलं आहे. काश्मीर फाइल्सने पहिल्या दिवशी ३.५५ कोटींची कमाई केली होती.
चित्रपटाबद्दल सांगायचं तर, आर्टिकल 370 जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद आणि भ्रष्टाचारावर आधारित आहे. यामीने या चित्रपटात इंटेलिजन्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे. यामी आणि प्रियामणी यांनी जबरदस्त अभिनय केला आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री देखील स्वतःच्या बळावर चित्रपट कसा उत्कृष्ट बनवू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट.
यामीसाठी हा चित्रपट खूप खास आहे कारण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान यामीला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती मिळाली. मात्र, ट्रेलर लॉन्च होईपर्यंत त्यांनी हे गुपित ठेवलं. ट्रेलर लाँचदरम्यान दोघांनी प्रेग्नेंसीची घोषणा केली.