Colors Marathi Ashok Ma Ma Serial Maharavivaar 2nd March Update
कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिकेत सध्या बऱ्याच घटना घडत आहेत. अशोक मामा यांची नोकरीमध्ये सुरु असलेली धडपड, त्यात नातवंडांची जबाबदारी यासगळ्यात मामा मुलांना काही कमी पडू नये याची काळजी घेत आहेत. त्यात भैरवीचे नवे प्लॅन आणि कुरघोड्या सुरूच आहेत. आता त्यातच अनिश आणि भैरवीने अचानक लग्न केल्याने मामांना मोठा धक्का बसला आहे. भैरवीच्या हेतूंबद्दल आधीच त्यांच्या मनात संशय होता, आणि आता या लग्नामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
अशोक मामा आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना, हे नवीन वादळ त्यांच्यासाठी अजून एक मोठं संकट ठरणार का, हा मोठा प्रश्न आहे. भैरवीचा गृहप्रवेश ठरेल का अशोक मा.मां साठी संकटाची नांदी ? जाणून घेण्यासाठी पहा अशोक मा.मा. महारविवार विशेष भाग २ मार्च दु. १ आणि रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
आशुतोष गोवारीकर यांच्या घरी लगीनघाई, मोठा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात
परशूरामने आधीच भैरवीविषयी संशय व्यक्त केला होता, आणि त्याच्या संशयावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. फुलराणीने परशूराम आणि भैरवीचे फोटो काढून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले होते. त्याच वेळी संयमीने घरात खोटं बोलून विश्वासघात केल्याचंही उघड झालं. पण या सगळ्याचा कळस म्हणजे अनिशने भैरवीसोबत लग्न करून आल्याची बातमी असणारा आहे. मामांनी आधीच घर विकण्याचा विचार सुरू केला होता, आणि आता भैरवी घरात आली, तर परिस्थिती अजूनच बिघडण्याची शक्यता आहे.
4000 लोकसंख्येचं गाव, 1000 यूट्यूबर्स! प्रत्येक जण आहे डिजिटल स्टार, कमाई ऐकून व्हाल थक्क
भैरवीच्या उपस्थितीमुळे कुटुंबात फूट पडणार का? अनिशच्या या निर्णयाने तो स्वतः अडचणीत सापडणार का? भैरवीला घरात प्रवेश द्यायचा की नाही, यावर आता मोठा पेच निर्माण झाला आहे. मामा भैरवीला घरात येण्यासाठी परवानगी देतील ? अनिशच्या निर्णयामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. त्याच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेत भैरवी कुटुंबावर वर्चस्व मिळवणार का? भैरवीला घरात प्रवेश मिळेल का? मालिकेत पुढे घडणार ? जाणून घेण्यासाठी बघा अशोक मा.मा. महारविवार विशेष भाग २ मार्च दु. १ आणि रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.