Ashutosh Gowariker Son Konark Will Marry Businessman Daughter Niyati Kanakia On March 2
‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये आशुतोष गोवारीकर हे नाव आदराने घेतलं जातं. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि दिग्दर्शनामुळे चर्चेत राहणारे आशुतोष गोवारीकर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. बॉलिवूडला अनेक सुपर डुपर हिट चित्रपट आणि वेबसीरीज देणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा लवकरच लग्न करणार आहे. मराठमोळे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मोठा मुलगा लवकरच गर्लफ्रेंडशी लग्नबंधनात अडकणार आहे.
4000 लोकसंख्येचं गाव, 1000 यूट्यूबर्स! प्रत्येक जण आहे डिजिटल स्टार, कमाई ऐकून व्हाल थक्क
आशुतोष गोवारीकर यांचा मोठा मुलगा कोणार्क गोवारीकर गर्लफ्रेंडसोबत येत्या २ मार्च रोजी लग्नगाठ बांधणार आहे. कोणार्क नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपर रसेश बाबुभाई कनकिया यांची कन्या नियती कनकियाशी लग्न करणार आहे. कोणार्क आणि नियती यांचा लग्न सोहळा मुंबईत भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नात सेलिब्रिटींसह उद्योगविश्वातील नामांकित उद्योगपती हजेरी लावतील. शिवाय, कोणार्क- नियतीच्या लग्नाला दोघांकडील कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित राहणार आहेत.
“अ परफेक्ट मर्डर”चा होणार महिलांसाठी विशेष प्रयोग, जाणून घ्या कधी आणि कुठे रंगणार ?
कोणार्क गोवारीकरविषयी बोलायचे झाल्यास तो त्याच्या वडिलांबरोबर फिल्ममेकिंगचे काम शिकतोय, शिवाय चित्रपट निर्मितीचेही तो बारकावे शिकत आहे. वडिलांप्रमाणेच चित्रपट उद्योगात काम करण्यास कोणार्क उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या पत्नीचं नाव सुनीता गोवारीकर असं असून आशुतोष आणि सुनीता गोवारीकर यांना दोन मुलं आहेत. कोणार्क हा मोठा मुलगा असून लहान्या मुलाचे नाव विश्वांग गोवारीकर आहे. आशुतोष गोवारीकर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक असून त्यांनी अनेक चित्रपटांची आणि काही वेबसीरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
Dacoit: ‘डकैत’ चित्रपटामध्ये अनुराग कश्यपची जबरदस्त एन्ट्री; या अनोख्या भूमिकेत चमकणार अभिनेता!
आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिनयातही पाऊल ठेवलं आहे. ते शेवटचे ‘मानवत मर्डर्स’वेबसीरीजमध्ये झळकले होते. त्याचबरोबर ‘काला पानी’या वेब सीरिजमध्येही त्यांनी मोठी आणि महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या शेवटच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘पानीपत’ होता. २०१९ साली रिलीज झालेला हा ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आशुतोष गोवारीकर यांनी ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’, ‘मोहेंजोदारो’, ‘बाजी’, ‘पानीपत’ सारख्या अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहेत. त्यापैकी बहुतांश चित्रपट सुपरहिट ठरले होते. आशुतोष गोवारीकर यांची अवघ्या इंडस्ट्रीमध्ये भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळख आहे.