स्वातंत्र्य दिनी प्रेक्षकांसाठी चित्रपटांचा महोत्सव असणार आहे. कारण याच दिवशी तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो श्रध्दा कपूर, राजकपूर रावचा स्त्री-2 , अक्षय कुमारचा ‘खेल खेल मे’ आणि जॉन अब्राहमचा ‘वेदा’ हे तीनही चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट मेजवानी असणार आहे.तीन बीग बजेट चित्रपट एकत्र प्रदर्शित होणार आहेत त्यामुळे या तीनमधून जो सर्वात चांगला चित्रपट असेल तो बॉक्स ऑफिसवर कमाल करणार आहे. तसे एका दिवशी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होतात त्यावेळीही बहुतांशवेळा एक चित्रपट हिट होतो तर एका चित्रपटाचे नुकसान होते. यावेळी तीन चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने कोणत्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील त्यावर सर्व गणित अवलंबून असणार आहे.
तीन चित्रपट एकत्र प्रदर्शित का?
वर्षात एकूण ५२ आठवडे असताना योग्य नियोजन करुन चित्रपटाला प्रदर्शित केले जाऊ शकते हे जरी खर असले तरी चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य चित्रपट त्यामुळे क्लॅश होणे स्वाभाविक आहे. त्याशिवाय आयपीएल, रमजान, श्राध्द पक्ष यावेळीही चित्रपट प्रदर्शन करण्यास निर्माते आतुर नसतात. ज्यावेळी सलमान, शाहरुख, आमीर यांचे चित्रपट प्रदर्शित होतात त्यावेळी त्या चित्रपटासोबत प्रदर्शन करणे बहुतांश वेळा धोक्याचे असते. अनेक बिग बजेट चित्रपटांच्या वेळी थिएटर मोठ्या प्रमाणात बूक असल्याने इतर चित्रपट प्रदर्शित करण्यात अडचण येते. वरुन साऊथच्या चित्रपटांशी असणारी स्पर्धा यामुळे यातून निर्मात्याला ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी ते चित्रपट प्रदर्शित करतात.
15 ऑगस्टला अक्षय कुमार चित्रपट घेऊन येतो. जॉन अब्राहमनेही स्वातंत्र्य दिनी चित्रपट प्रदर्शित केले आहेत. अक्षयचा गोल्ड आणि जॉनच्या सत्यमेव जयतेमध्ये क्लॅश झाला होता. त्यावेळी सत्यमेव जयते वरचढ ठरला होता. यावेळी जॉन, अक्षयला, राजकुमार आणि श्रध्दाशी स्पर्धा करायची आहे. काल गुरुवार दि. 18 जुलैला स्त्री चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉंच झाला. त्यावेळी निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी यशाबद्दल विश्वास व्यक्त केला. या स्पर्धेत जो जिता वही सिंकदर असे त्यांनी म्हटले.
चित्रपट आणि कलाकार
‘खेल खेल में’ अक्षय कुमारसोबत तापसी पन्नू, वाणी कपूर आणि फरदीन खान दिसतील तर स्त्री -2 मध्ये श्रध्दा कपूर, राजकुमार राव यांच्या सोबत पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी ही जुनी टीम दिसेल आणि वेदामध्ये जॉन आणि शर्वरी वाघ दिसेल.