फोटो सौजन्य: शिव ठाकरे इन्स्टाग्राम व्हिडिओ
१४ फेब्रुवारी रोजी जगभरात आजचा दिवस हा ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. आणि आजच्या दिवसाचं मुळ कारण म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीप्रती व्यक्त केलं जाणारं प्रेम… नातेसंबंध साजरे करण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीसोबत आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा हा काळ आहे. आता अशातच आपल्या आयुष्यातील महत्वाचा व्यक्ती हा कोणीही असू शकतो. बॉलिवूड अभिनेता शिव ठाकरे ह्याने आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत आपला ‘व्हॅलेंटाईन डे’ सेलिब्रेट केला आहे. अभिनेत्याने सेलिब्रेशन दरम्यानचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
‘धर्म निभावताना पश्चाताप केला तर…’; महेश मांजरेकरांच्या ‘देवमाणूस’चा उत्कंठावर्धक टीझर रिलीज
अभिनेता शिव ठाकरेने यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ त्याच्या जवळच्या खास व्यक्तीसोबत साजरा केला आहे. त्याने हा सेलिब्रेशनचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला असून जो इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याने हा खास प्रेमाचा दिवस त्याच्या आजीसोबत स्पेंड केला आहे. त्याने आजीसोबतच्या डेटचा व्हिडिओ “माझ्या आजीसोबत व्हॅलेंटाईन डेट” असं कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्याच्या ‘व्हॅलेंटाईन डे’चं खास सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर शिवच्या व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, शिव ठाकरे ‘व्हॅलेंटाईन डे’ त्याच्या आजीसोबत सेलिब्रेट करताना दिसत आहे. दरम्यान, सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो आपल्या आजीला कारमधून उतरवून हॉटेलमध्ये घेवून जाताना दिसत आहे. तिथं त्याने आपल्या आजीसोबत खास हॉटेलमध्ये जाऊन वेळही घालवला. शिवने मात्र हे सिद्ध केलं की, व्हॅलेंटाईन डे फक्त कपलचाच दिवस नाही तर तुमच्या प्रियजणांसोबत वेळ घालवण्याचा, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे शिवच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
मुरलेल्या नात्याची ‘गुलकंद’ची लव्हस्टोरी, सई- समीरची भन्नाट जोडी
अभिनेत्याने आपल्या आजीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ खास पद्धतीने सेलिब्रेट केला असून चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, अभिनेत्याने आपल्या आजीसोबतचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला तुम्ही पाहू शकता. शिव ठाकरेचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. त्यामुळे तो नेमकं कोणाला डेट करत आहे? हे सर्वांनाच जाणून घ्यायचंय. व्हॅलेंटाईन डे स्पेशल त्याच्या व्हिडिओने सर्वांच्या भुवया उंचावल्या. अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
“लकीएस्ट आजी”, “आजी- नातवाच्या जोडीला कोणाचीही नजर ना लागो…”, “बेस्ट व्हॅलेंटाईन”, “क्यूट व्हिडिओ”, “आजीसोबतचा खूप सुंदर क्षण”, “आजीसाठीचा सर्वोत्तम क्षण” शिवाय अनेक सेलिब्रिटींनी शिव आणि त्याच्या आजीच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी आजीला आणि शिवला दोघांनाही लकी म्हटलं.