वडिलांकडून अभिमानाचे शब्द ऐकताच डीपी दादाच्या अश्रूंचा बांध फुटला, Video Viral
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. पुढच्या आठवड्यात बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात बिग बॉसच्या आठवड्यात ‘फॅमिली वीक’चे आयोजन करण्यात आले आहे. या आठवड्यात घरातल्या सर्व स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. आजच्या आठवड्यात अभिजीत सावंतनंतर आणखी एका स्पर्धकाचे आई- वडिल येणार आहेत. तो स्पर्धक म्हणजे डीपी दादा.
सोशल मीडियावर काही वेळापूर्वीच प्रोमो रिलीज झाला आहे. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, डीपी दादाचे आई- वडिल आणि त्याची पत्नी घरात आलेले पाहायला मिळणार आहे. इतक्या दिवसांनी आपल्या कुटुंबातील लोकांना पाहणार म्हणून आपसूकच सदस्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर अश्रू अनावर झाले. डीपी दादाचे वडील त्याला जेव्हा भेटायला गेले त्यावेळी त्याच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आतमध्ये घरात वडील येताच त्याने वडिलांना मिठी मारत आपल्या अश्रूंची वाट मोकळी केली. शिवाय आई आणि पत्नी यांनाही भेटल्यानंतर तो रडला.
कलर्स मराठीकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये, ‘एका सदस्याचं स्वप्न होतं की वडिलांनी आपलं कौतुक करावं आणि आज तो दिवस आला आहे’, अशी बिग बॉस घोषणा करतात. ही घोषणा ऐकताच धनंजयचे डोळे पाणावतात. पुढे दार उघडतं आणि DPचे बाबा घरात येतात. DP बाबांना घट्ट मिठी मारून आपल्या अश्रूंची वाट मोकळी करतो. तब्बल दोन महिन्यांनंतर आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटणार म्हटल्यावर, सहाजिकच कोणत्याही सदस्याचा डोळ्यात पाणी येणारच. जेव्हा डीपी आपल्या वडिलांना मिठी मारतो, त्यावेळी दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहतात. पुढे DP दादाच्या आईची आणि पत्नीचीही बिग बॉसच्या घरात एन्ट्री होते.
हे देखील वाचा – ‘नाद’ म्हणजे काय ? Naad- The Hard Love चा टीझर उलगडणार प्रेमाची नवी व्याख्या
पुढे प्रोमोमध्ये, DP चे वडील घरात आल्यानंतर तो त्यांना सोफ्यावर बसवून त्यांचे पाय दाबताना तो दिसतो. त्याचवेळी डीपी दादाच्या आईची आणि पत्नीचीही एन्ट्री होते. घरात आल्यानंतर त्यांनी दोघींनीही घरातल्या इतर सदस्यांना हात जोडून नमस्कार करत घरात प्रवेश केला. दोघींच्या डोळ्यात पाणी असतं. पत्नी आल्या आल्याच DP ला वाकून नमस्कार करते. पुढे आई आणि पत्नी दोघीही DP ला मिठी मारतात. “मला अभिमान वाटतोय तुझा”, असं आई DP ला म्हणते. अशाप्रकारे DP दादाच्या अश्रूचा बांध फुटतो. सध्या बिग बॉसच्या घरात ‘फॅमिली वीक’ सुरू आहे. त्यामुळे सर्वच सदस्यांचे आई- वडील घरात हजर राहतील.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील मंडळी आज एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळतील. त्यांचे रडवेले चेहरे पाहताना प्रेक्षकदेखील भावनिक झालेले पाहायला मिळतील. आज घरात ड्रामा, टास्क नाट्य नसेल तर सदस्यांचे खरे चेहरे पाहायला मिळतील.