फोटो सौजन्य: सोशल मीडिया
टिव्हीवरील म्युझिकल शो ‘अंताक्षरी’ सर्वांच्या आजही लक्षात आहे. हा शो अभिनेते आणि गायक अन्नू कपूर यांनी होस्ट केला आहे. आजही अंताक्षरीचे नाव घेतले की, अन्नू कपूरचा चेहरा सर्वांच्याच समोर उभा राहातो. ‘काला पत्थर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अन्नू कपूरने आपल्या होस्टिंगच्या माध्यमातून आणि अभिनयाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी ‘बेताब’, ‘मंडी’, ‘आधारशिला’ आणि ‘खंडर मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘घायल’, ‘हम’, ‘डर’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. आज २० फेब्रुवारी रोजी अन्नू कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी…
रंजक ट्विस्टमधून उलगडणार ‘म्हणजे वाघाचे पंजे’ची आकर्षक कहाणी, मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा
अन्नू कपूर यांना विशेष ओळखीची गरज नाही. नाटक, टिव्ही, चित्रपट आणि रेडिओ या चारही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडलीये. २० फेब्रुवारी १९५६ रोजी मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये जन्मलेल्या अन्नू कपूर यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. त्यांचे वडील मदनलाल कपूर पारशी थिएटर कंपनी चालवत होते आणि त्यांची आई उर्दू शिक्षिका आणि शास्त्रीय नृत्यांगना होती. वडिलांच्या सल्ल्याने, अन्नू कपूर एका थिएटर कंपनीत सामील झाले आणि त्यांनी आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडले. अन्नू कपूर यांचे खरं नाव अनिल कपूर आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांनी आपलं नाव, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर आपलं नाव बदलले. अभिनेत्याने स्वतः काही वर्षांपूर्वी हे उघड केले होते.
लोटपोट हसण्यासाठी तयार रहा, ‘चिकी चिकी बुबूम बुम’चा मजेशीर ट्रेलर रिलीज
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी १९८४ मध्ये मुंबईत आलो आणि तोपर्यंत अनिल कपूर अभिनेता झाला होता. त्याचा जन्म डिसेंबर १९५६ मध्ये झाला आणि माझा जन्म फेब्रुवारी १९५६ मध्ये झाला… आता, तो एक हिरो आहे आणि मी एक शून्य आहे. कायमच शून्याला तडजोड करावी लागते. भारतात अनुराधा, अनिल, अनुपम, अनीस आणि अन्वर नावाच्या लोकांना अन्नू हे टोपणनाव असतं. म्हणून, माझ्या कुटुंबानेही मला अन्नू असंच टोपणनाव दिलं होतं. आणि तेच माझं फिल्म इंडस्ट्रीतलं नाव झालं. ‘अन्नू कपूर’ नावाने मला आजवर जी काही प्रसिद्धी मिळाली आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. मी माझ्या कामातून कायमच सर्वोत्तम देण्याचे काम केले आहे.”
शिवजयंतीनिमित्त संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेली कविता व्हायरल; वाचा कविता…
अन्नू कपूर यांनी आपल्या फिल्मी करियरला १९७९ पासून सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २२- २३ व्या वर्षी अभिनेत्याने ७० वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली. या व्यक्तिरेखेमुळे अन्नू कपूरला प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्याने रुपेरी पडद्यावर १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो शेवटचा ‘हमारे बारह’ चित्रपटात दिसला होता. याशिवाय अभिनेत्याने ‘परम वीर चक्र’, ‘अजनबी’, ‘कबीर’ या टीव्ही शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त, अन्नू ‘सुहाना सफर विथ अन्नू कपूर’ नावाचा एक रेडिओ शो देखील करतो. हा दररोजचा कार्यक्रम असतो. “फिल्मी दुनिया की कही अनकही कहानियां।” अशी त्या शोची टॅगलाइन आहे. अभिनेत्याने त्याच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि टीव्ही अकादमी पुरस्कार जिंकले आहेत.