(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवुड स्टार आयुष्मान खुराणाचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘थामा’ 21 ऑक्टोबरला थिएटर्समध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्यापूर्वी त्याने अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे, जे तुम्ही विविध OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
आयुष्मान खुराणाने त्यांच्या करिअरमध्ये नेहमी हटके आणि वेगळ्या शैलीतील चित्रपट केले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांनी त्याने बॉलीवुडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. आता दिवाळीच्या सणाला त्यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘थामा’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जर तुम्ही आयुष्मान खुराणाचे चाहते असाल, तर तुम्हाला त्याच्या या ७ खास चित्रपटांना नक्कीच पाहायला हवे.
विक्की डोनर:
या चित्रपटातून आयुष्मान खुराणाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात त्याने स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती. ‘विक्की डोनर’ तुम्ही ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
ड्रीम गर्ल 2:
या कॉमेडीने परिपूर्ण चित्रपटात आयुष्मान खुराणाने करमची भूमिका साकारली आहे,या सिक्वेलमध्ये कॉमेडीची पातळी आणखी वाढते आणि आयुष्मानची जबरदस्त कॉमिक टाइमिंग तुम्हाला पाहायला मिळते. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
आर्टिकल 15:
आयुष्मान खुराणाचा हा एक जबरदस्त सोशल ड्रामा चित्रपट आहे, ज्यात त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो ग्रामीण भागातील जातीय गुन्ह्यांची चौकशी करतो आणि नंतर एक धक्कादायक खुलासा होतो. ‘आर्टिकल 15’ चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
अंधाधुन:
ही एक मर्डर मिस्ट्री फिल्म आहे ज्यात सस्पेन्स आणि डार्क ह्युमरचा भन्नाट संगम आहे. आयुष्मान खुराणाने अशा तरुणाची भूमिका साकारली आहे, जो एका मर्डर मिस्ट्रीमध्ये गुंततो. चित्रपटाचा क्लायमॅक्स अतिशय प्रभावी आहे आणि या चित्रपटाने तब्बल ३५ पुरस्कार जिंकले आहेत. ‘अंधाधुन’ आयुष्मानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत टॉपवर आहे आणि तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
एन अॅक्शन हीरो:
‘एन अॅक्शन हीरो’ हा आयुष्मान खुराणाचा एक थरारक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात त्याने एका फिल्म स्टारची भूमिका साकारली आहे, जो एका धोकादायक परिस्थितीत अडकतो. या चित्रपटात जयदीप अहलावत देखील दमदार भूमिका साकारतात. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
बाला:
या कॉमेडीने परिपूर्ण चित्रपटात आयुष्मान खुराणाने एका अशा तरुणाची भूमिका साकारली आहे.आयुष्मान खुराणाचा ‘बाला’ चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
दिवाळीनिमित्त Sunny Deolचा धमाका, वाढदिवशी जाहीर केला नवीन चित्रपट, कधी होणार रिलीज?
शुभ मंगल ज्यादा सावधान:
आयुष्मान खुराणाचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली. ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ मध्ये जितेंद्र कुमार देखील प्रमुख भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.