(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नुकताच ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला आहे. पुरस्कार सोहळ्यातील एका व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. त्यातील एका व्हिडीओनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तो व्हिडीओ आहे शाहरुख खान आणि ‘नाळ २’ चित्रपटामधील बालकलाकार भार्गव जगताप यांचा. शाहरुख खानचा प्रेमळ स्वभाव यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा व्हिडीओ पाहून शाहरुखचं कौतुक होताना दिसत आहे.
बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर नाळ या मराठी चित्रपटातील बालकलाकार भार्गव जगतापला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आले आहे. अभिनेते शाहरुख खान आणि भार्गव जगतापचा एकत्र व्हिडीओपाहून चाहते खूप खुश झाले आहेत. तसेच व्हिडिओला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
Rajinikanth यांचा Jailer 2 च्या रिलीजची घोषणा… स्वतः रजनीकांत यांनी दिली माहिती!
दरम्यान पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान आपले अवॉर्ड घेऊन आपल्या जागेवर परत येत असताना भार्गव जगतापने अभिनेत्याचं अभिनंदन केलं. भार्गवने शाहरुखकडे हात पुढे केला. शाहरुखने देखील त्याच्याशी हात मिळवला दोघांनी हँडशेक केला. भार्गव शाहरुख खानच्या पाया पडला. त्यानंतर शाहरुखने भार्गवला मिठी मारली. आपल्या मुलाप्रमाणे त्याच्या खांद्यावर विश्वासानं हात ठेवला आणि त्यालाही शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओने लोकांचे मन जिंकले आहे.
हा क्षण प्रेक्षकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. एका बाजूला हिंदी सिनेसृष्टीचा सुपरस्टार शाहरुख खान आणि दुसऱ्या बाजूला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला मराठी बालकलाकार. या दोघांची ही भेट एका व्हिडिओमध्ये कैद झाली आणि हा क्षण खूप सुंदर होत. शाहरुखच्या या कृतीचं सगळेच कौतुक करत आहेत. भार्गव देखील शाहरुखला ज्याप्रकारे भेटला त्यासाठी त्याचंही अभिनंदन केलं जातंय. व्हिजीओ पाहून अनेकांनी कमेंट करत शाहरुखचं कौतुक केलं आहे. एकाने लिहिलं, हम्बल किंग. दुसऱ्यानं लिहिलंय, हेच कारण आहे त्यामुळेच तो किंग खान आहे.
‘जेव्हा जोडीदार खूप जवळ…’ सलमान खानला बनायचं आहे बाबा? नेमकं काय आहे प्रकरण?
भार्गव बद्दल बोलायचं झाल्यास भार्गवीने नाळ या सिनेमात उत्तम काम केलं आहे. त्याला त्याच्या भुमिकेसाठी यंदाचा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे. नाळ सिनेमातील तिनही बालकलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. भार्गवीसह त्रिशा ठोसर आणि श्रीनिवास पोकळे यांनीही राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे.