(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
दक्षिण भारताचे सुपरस्टार रजनीकांत सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांच्या नुकत्याच आलेल्या ‘कुली’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली असून, आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्यांच्या आगामी अॅक्शन थ्रिलरवर ‘जेलर 2’. या चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा स्वतः रजनीकांत यांनी केली आहे.
‘जेलर 2’ हा 2023 मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘जेलर’ चा सिक्वेल आहे. ‘जेलर’ ने जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई करत तमिळ चित्रपटसृष्टीत इतिहास रचला होता. रजनीकांत यांचा अॅक्शनपॅक्ड रोल, दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांचं दमदार सादरीकरण आणि प्रभावी संवाद यामुळे चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. ते म्हणाले “आम्ही ‘जेलर 2’ च्या स्क्रिप्टवर बराच काम केलं आहे आणि आम्हाला ती खूप आवडली आहे. मात्र, शूटिंग पूर्ण होईपर्यंत मी या चित्रपटाच्या निकालाबाबत काहीही सांगू शकत नाही. तरीही, मला आशा आहे की प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडेल.”त्यांच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे, कारण यावरून स्पष्ट होते की ‘जेलर 2’ प्री-प्रोडक्शनच्या अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच शूटिंग पूर्ण होणार आहे.
जान्हवी कपूर बनली “रिक्षाचालक”, मनीष पॉलसोबतच्या BTS व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
रजनीकांत यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे की ‘जेलर 2’ हा चित्रपट 12 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जेलर’ अजूनही चाहत्यांच्या मनात ताजाच आहे. या चित्रपटात त्यांनी साकारलेली रिटायर्ड पोलीस ऑफिसर ‘मुथुवेल पांडियन’ ही भूमिका प्रचंड गाजली होती.‘जेलर 2’ मध्ये रजनीकांत यांच्या सोबत काही नवे कलाकार देखील सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याच बरोबर दोन दिग्गजांची एन्ट्री देखील होणार असून त्यांच्या भूमिका कोणत्या असतील यावर अद्याप अधिकृत माहिती नाही, पण चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
महेश बाबूची डेन्व्हरसह हातमिळवणी! नवं प्रीमियम कलेक्शन आणलं बाजारात