(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अलिकडेच अभिनेता आमिर खान त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अचानक सिनेमागृहात पोहोचला आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्याला पाहून चाहते खूप खुश झाले. आमिर खान टॉकीजच्या यूट्यूब चॅनलवर हा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आमिरच्या तिथे येण्याने प्रेक्षक खूप आनंदी झाले आणि त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. चित्रपटातील नवीन कलाकारांमधील काही कलाकारही त्याच्यासोबत उपस्थित होते.
आमिर खानने थिएटरमध्ये केला अचानक प्रवेश
‘तारे जमीन पर’ चित्रपटाप्रमाणेच ‘सितार जमीन पर’ ही एक भावनिक कथा आहे. Sacnilk.com च्या मते, या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे ६० कोटी रुपये कमावले आहेत. व्हिडिओमध्ये, आमिर प्रेक्षकांना विचारतो, ‘तुम्हाला चित्रपट कसा वाटला?’ ज्यावर लोकांनी चित्रपट उत्तम असल्याचे म्हटले. एका प्रेक्षकांनी म्हटले, ‘आमिर, आम्हाला तुझा अभिमान आहे. तू खूप छान काम केले आहेस.’ यानंतर, आमिरने चित्रपटाचे दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना आणि उर्वरित टीमची प्रेक्षकांना ओळख करून दिली.
‘या’ कारणामुळे जेनीलिया देशमुख एक दशक चित्रपटांपासून राहिली दूर, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
आमिरने प्रेक्षकांना सांगितले की त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तो त्यांचा आभारी आहे. आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्ही सर्वजण खूप भावनिक आहोत. त्याने चित्रपटातील नवीन कलाकारांचे कौतुकही केले आणि सांगितले की ही सर्व मुले चित्रपटाचा गाभा आणि हृदय आहेत. चित्रपटात काम करणाऱ्या काही मुलांनीही प्रेक्षकांशी संवाद साधला. निघताना आमिरने पुन्हा एकदा चित्रपटाला मिळालेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले. अभिनेत्याला पाहून प्रेक्षक खूप आनंदी झाले.
‘सितारे जमीन पर’ चित्रपटाबद्दल
सितारे जमीन पर मध्ये आरोश दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर या 10 नवोदित कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आरएस प्रसन्ना यांनी केले असून त्यात आमिर खान आणि जेनिलिया देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
महेश बाबू आमिरच्या ‘Sitaare Zameen Par’चा झाला चाहता; म्हणाला ‘चित्रपट तुम्हाला हसवेल आणि रडवेलही…’
चित्रपटाची गाणी अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली असून शंकर-एहसान-लॉय यांनी संगीत दिले आहे. कथा दिव्या निधी शर्मा यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली असून रवी भागचंदका यांची निर्मिती आहे. हा चित्रपट 20 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच हा चित्रपट आता सिनेमागृहात चांगले कलेक्शन करत आहे.